Mla Sanjay Gaikwad warns BJP  Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad : ...अन्यथा भाजपसोबतची युती तुटेल; शिंदे गटातील आमदाराचा थेट इशारा

शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राज्यपालांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव, साम टीव्ही

Mla Sanjay Gaikwad News : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर राज्यभरात वादंग उठलं असून अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्यपालांवर जोरदार केल्यानंतर आता शिंदे गटातील बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा राज्यपालांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.  (Latest Marathi News)

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील, असा इशाराच आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिला. ज्या शिवरायांनी महाराष्ट्र घडविला. अशा महान व्यक्तीबद्दल त्याच राज्याच्या राज्यपालांनी एकेरी उल्लेख करणं कितपत योग्य आहे, असा सवालहीी संजय गायकवाड यांनी केला.

आमदार संजय गायकवाडांचा भाजपला इशारा

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी भाजपचे नेते सुधांशू यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या लोकांनी विचार करुन छत्रपतींच्या बाबतीत बोललं पाहिजे. अशाप्रकारचा अपमान आम्ही सहन करणार नाही. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर हे चांगलं नाही, अशा विधानांनी एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील," असा इशाराही गायकवाड यांनी दिला.

'अशा राज्यपालांना खुर्चीवर ठेऊन काही फायदा नाही.'

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari)  यांच्यावर टीका करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, की 'भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना विनंती आहे की, ज्या राज्यपालांना राज्याचा इतिहास माहिती नाही, अशा राज्यपालांना खुर्चीवर ठेऊन काही फायदा नाही. मराठी मातीतला माणूसच या ठिकाणी हवा. त्यामुळे या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचे तिथे पाठवा'

राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दबल आक्षेपार्ह विधान केले. 'तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत', असे वक्तव्य कोश्यारी यांनी केलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT