Sanjay Raut : संजय राऊतांना मध्यरात्री राहुल गांधींचा फोन; नेमकी काय चर्चा झाली?

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मला रविवारी मध्यरात्री फोन आला होता, असं ट्विट राऊतांनी केलं आहे.
Shivsena Sanjay Raut, Congress Rahul Gandhi
Shivsena Sanjay Raut, Congress Rahul GandhiSaam TV

Sanjay Raut News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वी तुरूंगातून सुटका झाली. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात पीएमएलए न्यायालयाने राऊतांचा जामीन मंजूर केला. दरम्यान, आता संजय राऊत (Sanjay Raut) पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. आज सकाळी राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं. काल म्हणजे, रविवारी मध्यरात्री काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मला फोन आला होता, असं ट्विट राऊतांनी केलं आहे. (Latest Marathi News)

Shivsena Sanjay Raut, Congress Rahul Gandhi
Pune Accident: पुण्यातल्या नवले पुलाजवळ इतके अपघात का होतात? धक्कादायक कारण समोर

'भारत जोडोत व्यस्त असूनही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय', असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

'राजकारणात मित्रं मित्र राहत नाही'

राजकारणात कडवटपणा आला आहे. त्यात ही प्रेमाची झुळूक होती. राजकारणात मित्रं मित्र राहत नाही. लोक पळून जातात. मी तुरुंगात असताना किती लोक माझ्या घरी आले? मला माहीत आहे. किती लोकांनी चौकशी केली मला माहीत आहे. ठाकरे परिवार, आमचा पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील माझ्या सहकाऱ्यांनी चौकशी केली, असंही संजय राऊत म्हणाले.

भाजप आणि मनसे असेल… या दोन्ही पक्षात आमचे सहकारी आहेत. मित्रं आहेत. आम्ही एकमेकांशी बोलत असतो. पण किती लोकांना आमची चिंता वाटली? एका खोट्या प्रकरणात अडकवून आपल्या राजकारणातील सहकाऱ्याला तुरुंगात टाकलं, त्याच्या घरची काय परिस्थिती असेल, किती लोकांनी चौकशी केली? असं म्हणत संजय राऊतांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

'राज्यपालांना माफी मागावीच लागेल'

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावरून सुद्धा संजय राऊत यांनी भाजपसह राज्यपालांना खडेबोल सुनावले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना माफी मागावीच लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. तरीही तुम्ही त्यांचा बचाव करत आहात. यावरून तुमचं महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम दिखावा आहे हे स्पष्ट होतं, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com