Ajit Pawar plane crash saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar plane crash : अजित पवारांनी ज्या विमानातून अखेरचा प्रवास केला, त्या कंपनीबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Baramati plane crash investigation details : बारामतीतील कथित विमान दुर्घटनेनंतर व्हीआरएस एव्हिएशनवर संशय; नेत्यांचा बहिष्कार आणि डीजीसीए चौकशीमुळे प्रकरणाला नवे वळण.

Namdeo Kumbhar

Baramati news updates : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला एक महिना होत असताना घातपाताचा संशय बळावला आहे. VRS कंपनीच्या विमानाने प्रवास करत असताना अजित पवार यांचे बारामतीमध्ये अकाली निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी त्या कंपनीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. VRS कपंनीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. पाहूयात नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काय निर्णय घेतला?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या आमदार, खासदारांनी VRS कंपनीची विमाने न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीएसआर लिअरजेट विमानाने प्रवास करताना अजित पवार यांचं अपघाती निधन झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आला. अनेकांकडून संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ४ व्हीएसआर विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली असून चौकशी करण्यात येत आहे.

कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी VRS कंपनी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. अजित दादांच्या अपघातानंतर शिंदे गटातील आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन व्हीएसआर कंपनीची सेवा वापरू नये, अशी विनंती केली होती. ही विनंती एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे VRS कंपनीच्या विमानाने बारामतीला निघाले होते, त्यावेळी अकाली निधन झाले होते. व्हीआरएस कंपनीही राजधानी दिल्लीमधील आहे. ते विमान व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​लिअरजेट ४५एक्सआर (व्हीटी-एसएसके) मॉडेलचे होते. बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्सची चार विमाने ग्राउंडिंग केली असून ऑपरेशनवर बंदी घालत मोठी कारवाई केली आहे. बारामती येथे झालेल्या विमान अपघातानंतर केलेल्या विशेष ऑडिट आणि देखरेखीदरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटींच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : तब्बल १०४ टन सोनं भारतात आलं, भारतातील सोन्याच्या किंमती कमी होणार? वाचा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यातील वाहतूक कोंडीची परिस्थिती कायम

Crime News : अहिल्यानगर हादरलं! किरकोळ वाद टोकाला गेला, मुलाने वडिलांवर चाकूने वार करत संपवलं

Plane Crash : खेळाडूंना घेऊन जाणारे विमान झाडांवर कोसळले; ५ जणांचा मृत्यू

Riteish- Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' १ नंबर ! रितेशच्या चित्रपटाने 'सैराट'लाही पछाडलं, रेकॉर्ड ब्रेक करत कमावले तब्बल 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT