ITI Saam TV
महाराष्ट्र

Education News: ITI आणि पॉलिटेक्निकमध्ये नवे कोर्स, राज्य सरकारनं केली घोषणा, वाचा नेमका प्लान काय?

ITI Short Term Course Started: आता आयटीआय आणि पॉलिटेक्निकमध्ये नवीन शॉर्ट टर्म कोर्स सुरु केला जाणार आहे. याबाबत मंगलप्रभात लोढा यांनी घोषणा केली आहे.

Siddhi Hande

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.आता लवकरच आयटीआय आणि पॉलिटेक्निकमध्ये शॉर्ट टर्म कोर्स सुरु होणार आहे, याबाबत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रमाची घोषणा केली आहे.दरम्यान, पंतप्रधान मोदी पहिल्या तुकडीचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करणार आहे.

४१९ आयटीआय आणि ४१ पॉलिटेक्निकमध्ये २५०६ तुकड्या सुरु होणार आहे.दरम्यान, याअंतर्गत दरवर्षी ७५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. याचसोबत कुंभमेळ्यासाठी वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट ट्रेडच्याहीदोन तुकड्या असणार आहे. इलेक्ट्रिकल व्हेईकल, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि एआयचे प्रशिक्षण मिळणार आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करावे, यासाठी मंगलप्रभात लोढा यांनी आवाहन केले आहे.

खासियत काय?

- महिलांसाठी तब्बल ३६४ स्वतंत्र तुकड्या असतील

- इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन उत्पादन, एआय, इंटरनेट ऑफ थिंग्जसारख्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ४०८ तुकड्या सुरु होतील

- आगामी कुंभमेळ्यासाठी "वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट" ट्रेडच्या दोन तुकड्या असतील

- गडचिरोली आयटीआय मध्ये ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिकचा व्यवसाय अभ्यासक्रम

- हरंगुल लातूर येथील संवेदना दिव्यांग खासगी आयटीआय येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गृह उपकरणे, टॅली आणि फॅशन तंत्रज्ञानाचे विशेष अभ्यासक्रम

- वाढवण बंदरासाठी प्रशिक्षित ड्रायव्हर उपलब्ध करून देणारे प्रशिक्षण

- ग्रीन हायड्रोजन प्रॉडक्शन व्यवसायाकरिता आठ तुकड्या, तर आयटीआय दादर (मुलींची) येथे सेमीकंडक्टर टेक्निशियन व्यवसाय सुरू होणार

- महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटर, गोंवडी आयटीआय येथे व शासकीय टेक्निकल हायस्कूल अमरावती व नागपूर येथे ॲडव्हान्स वेल्डिंग, अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड ॲडव्हान्स सीएनसी, इंटरनेट ऑफ थींग्ज हे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader Passes Away : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, एम्स रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास

Nanded Crime : गरबा चालवण्यासाठी हप्त्याची मागणी करत तलवारीने मारहाण; तिघांना घेतले ताब्यात

Dark Circles: महागडे क्रीम कशाला? डार्क सर्कल्स कमी करण्याचे १० नैसर्गिक उपाय ठरतील बेस्ट

CSMT-Kurla New Line : मध्य रेल्वेचा लेटमार्क कधी संपणार? CSMT ते कुर्ला पाचव्या अन् सहाव्या लाइनचं काम किती झालं? वाचा

Snake Tragedy : साप पकडण्याचं धाडस जीवावर बेतलं, जालन्यात ३० वर्षाच्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT