Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

Dharashiv News : नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी अधिक होत असल्याने या गर्दीत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक देखील घुसत असतात. त्यांची ओळख पटविण्यासाठी तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे लावण्यात येत आहेत
Tulja Bhawani
Tulja BhawaniSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 

धाराशिव : नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. या गर्दीवर नजर ठेवण्यासाठी तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवात यावर्षी पहील्यांदाच एआय कॅमेरे वापरले जाणार आहेत. अर्थात गर्दीत होणाऱ्या चोऱ्या रोखणे तसेच गुन्हेगारांची ओळख पटविण्यासाठी एआय कॅमेरे मंदिर परिसरात ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत. 

येत्या २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवास सुरवात होत आहे. त्यानुसार तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. या नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. हि गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि गर्दी होणाऱ्या चोऱ्यांवर लक्ष घेवण्यासाठी मंदिराच्या आवारात सीसीटीव्ही लावले जातात. त्यानुसार यंदा एआय कॅमेरे लावण्यात येत आहेत.  

Tulja Bhawani
Shirdi Saibaba : साई प्रसादालयात आता साई आमटीचा प्रसाद; दर गुरुवारी भाविकांना मिळणार लाभ

सॉफ्टवेअरमध्ये गुन्हेगारांच्या फोटोसह माहिती 
नवरात्र उत्सवात होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पहिल्यांदाच एआय कॅमेऱ्याचा वापर करण्यात येत आहे. याशिवाय तुळजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या फोटोसह इतर माहिती एआय सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती मंदिर संस्थांकडून देण्यात आली आहे. अर्थात चेहऱ्याची ओळख पटविण्यासाठी, गर्दीचे नियोजनासाठीही एआय कॅमेऱ्याचा वापर होणार आहे. 

Tulja Bhawani
PMPML : श्री क्षेत्र देहू- भंडारा डोंगर बससेवेचा शुभारंभ; दिवसभरात मारणार सात फेऱ्या

१०२ कॅमेरांची नजर 

दर्शन मंडप, तुळजाभवानी मंदिर, शहरात महत्वाच्या ठिकाणी एआय कॅमेरे बसवले जाणार आहेत. या माध्यमातून नवरात्र महोत्सवात किती भाविकांनी दर्शन घेतले; याची देखील नोंद होणार आहे. तर एआय कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यास मदत होणार असून कायदा आणि सुव्यवस्थेसाठी यात्रा काळात शहरात १०२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com