Anil Deshmukh यांना लूकआऊट नोटीस जारी, वाचा सविस्तर Saam Tv news
महाराष्ट्र

Anil Deshmukh यांना लूकआऊट नोटीस जारी, वाचा सविस्तर

या लूकआऊट नोटीसमुळे आता अनिल देशमुख यांना देशाबाहेर जाता येणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात ईडीने लूकआऊट नोटीस जारी (ED Lookout Notice) केली आहे. 100 कोटी रुपयांचे वसुली आदेश प्रकरणात ईडीने (ED) ही लूकआऊट नोटीस जारी केली आहे. देशमुखांना आतापर्यंत ५ वेळा समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर न झाल्याने त्यांना अखेर लूकआऊट नोटीस जारी जारी करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

या लूकआऊट नोटीसमुळे आता अनिल देशमुख यांना देशाबाहेर जाता येणार नाही. इतकेच नव्हे तर लूकआऊट नोटीसनुसार पोलीसांना देशमुख यांना देशभरातून शोधून काढण्याचे अधिकार मिळाले आहेत. देशभरातील विमानतळांनादेखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे जर त्यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विमानतळावरच अडवले जाईल, अशी माहिती अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान ईडीची ३ पथके राज्यभरात अनिल देशमुखांना शोधण्यासाठी कार्यरत आहेत. देशमुखांना शोधण्यासाठी ईडीने आतापर्यंत 12 ते 14 वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. या लूकआऊटमुळे आता परराज्यातही त्यांच्या शोध सुरु झाल्याचं जयश्री पाटील यांनी म्हंटल आहे. तथापि, आतापर्यंत ईडीने 5 समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. ईडीने 25 जूनला पहिलं, २६ जूनला दूसरं, 5 जुलै रोजी तिसरं समन्स बजावले होते. तर 30 जुलै रोजी चौथं आणि 18 ऑगस्टला पाचवं समन्स होतं. मात्र, ५ वेळा समन्स बजावूनही ते एकदाही चौकशीला हजर राहिले नाही. त्यामुळे अखेर ईडीने त्यांना लूकआऊट नोटीस जारी केलं आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT