Maharashtra Weather: IMD कडून 4 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा
पुणे : भारतीय हवामान विभागाने IMD रविवारी महाराष्ट्रासाठी Maharashtra अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार, 9 सप्टेंबरपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते जोरदार मुसळधार पाऊस Rain पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हे देखील पहा-
तर ऑरेंज अलर्ट Orange Alert 9 सप्टेंबरपर्यंत असेल आणि तो 4 जिल्ह्यांसाठी देण्यात आलं आहे. यात नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरीसह 4 जिल्ह्यांसाठी जारी करण्यात आला आहे.
"पुढील 48 तासांदरम्यान उत्तर आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर Bay Of Bengal कमी दाबाचे क्षेत्र low-pressure area तयार होणे आणि इतर संबंधित सायनोप्टिक वैशिष्ट्ये पाहता, महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांमध्ये सक्रिय पावसाचा जोर धरण्याची शक्यता आहे." असे आयएमडीने सांगितले आहे.
ऑगस्ट महिन्यात तुलनेने कोकण Konkan मध्ये कमी पाऊस नोंदविला गेला होता. त्यामुळे आता कोकणातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीसह प्रदेशात जास्त पावसाची अपेक्षा आहे.
ऑगस्टमध्ये अपुरा पाऊस नोंदवल्यानंतर, आयएमडीने सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.