Earthquake  
महाराष्ट्र

Earthquake: मराठवाड्याला भूकंपाचा हादरा, हिंगोली,नांदेड,परभणी हादरली

Earthquake In Marathwada : बुधवारची सकाळ मराठवाड्यासाठी हादरे देणारी ठरली. मराठवाड्यात ४ ठिकाणी भूकंपाचे तीव्र झटके बसले. या हादऱ्यांनी किल्लारीच्या आठवणी जाग्या झाल्या..पाहूया..

Tanmay Tillu

हिंगोली, नांदेड आणि परभणी हे जिल्हे भूकंपानं हादरले. हिंगोलीतील औंढा नागनाथसह वसमत तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. तर परभणी आणि नांदेडमध्येही भूकंपाचे हादरे जाणवले. नांदेडसह परभणीत झालेल्या भूकंपाची तीव्रता ही 4.2 रिश्टर स्केल इतकी होती...भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 13 किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

मराठवाड्यात 30 सप्टेंबर 1993 रोजी पहाटे 3 वाजून 56 मिनिटांनी झालेल्या भूकंपाने तांडव माजलं होतं. या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस 70 किमी अंतरावर किल्लारीजवळ होतं. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.04 मोजली गेली होती. या धक्क्यात हजारो लोकं, जनावरांचा मृत्यू झाला. तर तितकेच लोक जखमी झाले. तेव्हाच्या उस्मानाबाद आणि आत्ताच्या धाराशीव जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं होतं. ही जखम आजच्या भूकंपाने पुन्हा एकदा ओली झालीये.

दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. मात्र बुधवारच्या भूकंपानं किल्लारीच्या कटू आठवणींनी अनेकांच्या काळजात धस्सं झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips : मुलांना 'ट्यूशन'ला पाठवताय? मग थांबा! लागतील 'या' वाईट सवयी अन् करिअर...

सर्वांच्या नजरा वळतील तुमच्याकडे; सुई-धागा इअररिंग्स, पाहा सोन्यातील ट्रेंडी डिझाइन्स

अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सुनील तटकरेंनी दिली मोठी हिंट

LPG संकटावर सरकारचं मोठं विधान, पर्याय शोधण्याचा जनतेलाच दिला सल्ला

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील दिग्रस शहरात गारांसह अवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT