मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भालेराव लवकरच करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भालेरावांच्या रूपाने राष्ट्रवादीला उदगीरमध्ये मोठा चेहरा मिळाला आहे. भालेराव हे येत्या निवडणुकीत विद्यमान मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात उमेदवार असण्याची शक्यता आहे.
भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित मानला जात आहे. भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आले आहेत. २०१९ मध्ये भाजपने त्यांना डावलून परभणीतील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे संजय बनसोडे विजयी झाले. संजय बनसोडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला असून महायुती सरकारमध्ये ते सध्या क्रीडामंत्री आहेत.
विधानसभेत संजय बनसोडे अजित पवार गटाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला अजित पवार गटाला मतद करावी लागणार आहे. त्यामुळे सुधाकर भालेराव यांना संधी मिळण्याची शक्यता कमी. त्यामुळे भालेराव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. उदगीर हा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र, आता राष्ट्रवादीच्या दोन गटातच विधानसभा निवडणुकीत सामना होण्याची शक्यता आहे.
एकेकाळी मराठवाड्यात भाजपची गोपीनाथ मुंडे खासदार आणि पंकजा मुंडे व सुधाकर भालेराव हे दोघे आमदार अशी स्थिती होती. मात्र पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे सुधाकर भालेराव कुरघोड्यांमुळे हैराण होते. त्यामुळे सुधाकार भालेराव गेल्या काही महिन्यांपासून भाजप सोडणार अशा चर्चा होत्या. त्यातच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा सुरू होती, आता त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.