पनवेल कामोठ्यातील कुमार फूड प्रोडक्ट्स कंपनीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली आहे. अत्यंत अस्वच्छता, दुर्गंधी असलेल्या ठिकाणी रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवणाऱ्या खाद्य कंपनीचं वास्त समोर आणलं आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार संबंधीत कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे मनसेने याची अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चायनिजच पदार्थ रेड चिली आणि सोया सॉसशिवाय पूर्णचं होऊ शकत नाहीत. लोकही अगदी चविने खातात. मात्र यात वापले जाणारे वेगवेगळे सॉस कुठे आणि कसे बनतात याची माहिती नसते. अन्न आणि औषध प्रशासनाचंही याकडे म्हणावं तसं लक्ष नसतं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे
दरम्यान आच पनवेलमध्ये समोर आलेल्या घटनेने जायनिज आणि रस्त्यावर बनणारे पदार्थ खाणाऱ्यांना धक्काच बसला आहे. चक्क एका घाणेरड्या जागेत रेड चिली सॉस आणि सोया सॉस बनवलं जात होतं. याची माहिती मिळताच आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे सॉस बनवणाऱ्या कुमार फूड प्रोडक्ट्स कंपनी धाड टाकली. कशापद्धतीने या कंपनीत घाणेरड्या ठिकाणी सॉस बनले जात आहेत हे जनतेसमोर आणलं आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे याची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क काय कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे. मध्यतंरी आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडलं होतं. हे प्रकरण देशभर गाजलं. समोशात झुरळ आणि आठ दिवसांपूर्वी तर गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात वाळा साप आढळ्याच्या घटना ताज्या असतानाच ही घटना समोर आल्यामुळे खळबळ माजली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.