Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pakistani Girl Looks Like Anushka Sharma: पाकिस्तानमध्ये अनुष्का शर्मा सारखी दिसणारी तरुणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तिचा व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले असून विराट कोहलीला टॅग करत आहेत.
Pakistani Girl Looks Like Anushka Sharma
Pakistani Girl Looks Like Anushka SharmaSaam Tv
Published On

Pakistani Girl Looks Like Anushka Sharma: सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदारपणे व्हायरल होत आहे ज्यात एक पाकिस्तानी तरुणी अनुष्का शर्मा सारखी दिसत आहे आणि तिचे रूप पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तरुणीचे नाव अनिशा तसनीम असून तिचा लूक बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चेहऱ्यासारखा असल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओमध्ये अनिशा हसताना दिसते आणि तिचा लूक खूपच सुंदर आहे, त्यामुळे अनेकांनी तिला सुरूवातीला खरच अनुष्का शर्मा समजले होते. सोशल मीडियावर या व्हिडिएओला भरपूर प्रतिसाद मिळत असून ही ‘लूकअलाइक’ पोस्ट हजारो लोकांनी पाहिली आणि हजारो लाईक्सही मिळाली आहेत.

Pakistani Girl Looks Like Anushka Sharma
Dhurandhar: 'मला वाटलं माझं पात्र...'; धुरंधरमुळे अक्षय खन्नाला प्रसिद्धी मिळाल्याने आर. माधवन नाराज?

या व्हिडीओवर चाहत्यांचे अनेक मजेदार कमेंट केल्या आहेत. काही युजर्सना तिची तुलना करत “वहिनीपेक्षा ही जास्त क्युट” अशी प्रतिक्रिया देताना दिसली, तर एकाने “रियल अनुष्का इथेच आहे”. तर आणखी एकाने 'अरे अनुष्का पाकिस्तानमध्ये कधी गेलीस' अशी कमेंट केली आहे.

Pakistani Girl Looks Like Anushka Sharma
Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

सोशल मीडियावर या प्रकारच्या ‘लूकअलाइक’ व्हिडीओजचा ट्रेंड पाहायला मिळत असतो, ज्यात प्रसिद्ध कलाकारांची रूपे सामान्य लोकांमध्ये मिळतात आणि त्यांचे व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होतात. अनिशा तसनीमची देखील अशीच तुलना सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या व्हिडीओने ४ लाखाहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळवले आहेत, ज्यामुळे हा विषय सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरत आहे.

दरम्यान, अनुष्का शर्मा स्वतः चित्रपटात बराच काळ दिसलेली नाही. तिची शेवटची मोठी भूमिका २०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपटात साकारली होती आणि त्यानंतर ती प्रामुख्याने प्रॉडक्शन हाऊसच्या कामात गुंतलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com