Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Rashmika - Vijay Wedding Photo: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले. रश्मिका आणि विजय यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संपूर्ण कहाणी जाणून घ्या.
Rashmika - Vijay Wedding Photo
Rashmika - Vijay Wedding Photo
Published On

Rashmika - Vijay: रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, यामध्ये महेश बाबू आणि प्रभास लग्नात पाहुणे म्हणून आलेले म्हणून दिसत आहेत. चाहते प्रश्न विचारत आहेत, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गुपचुप लग्न केले आहे का? व्हायरल झालेल्या फोटोंमागील सत्य काय जाणून घ्या...

रश्मिका आणि विजय

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा वधू-वराच्या पोशाखात दिसत आहेत. रश्मिका नव्या नवरीच्या पोशाखात खूप गोंडस दिसत आहे. दोन्ही स्टार खूप खूश दिसत आहेत. प्रभास, महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर या कलाकारांनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली. या फोटोमुळे प्रश्नांची एकच झुंबड उडाली आहे. रश्मिका आणि विजयचे चाहते सत्य जाणून घेऊ इच्छितात.

Rashmika - Vijay Wedding Photo
Happy Patel: आमिर खानच्या 'हॅपी पटेल'मधून डीके बोसची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; इमरान खान करणार कमबॅक? पाहा ट्रेलर

व्हायरल झालेले फोटो खरे आहेत का?

रश्मिका आणि विजयचे व्हायरल झालेले फोटो प्रत्यक्षात एआय-जनरेटेड आहेत. हे खरे फोटो नाहीत. ते एका चाहत्याने तयार केले होते आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो इतके खरे दिसतात की ते एआयने तयार केले आहेत हे ओळखणे कठीण आहे. स्टेज सुंदरपणे सजवलेला आहे. रश्मिका आणि विजयची नावे बॅकस्टेजवर स्पष्टपणे लिहिलेली आहेत. रश्मिका आणि विजय यांचे अजून लग्न झाले नाहीत. हे फोटो बनावट आहेत.

Rashmika - Vijay Wedding Photo
Box Office Collection: 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ; शाहरुख खानच्या 'या' चित्रपटाचा केला रेकॉर्ड ब्रेक

रश्मिका मंदान्नाने बॅचलरेट पार्टी केली होती का?

चाहते रश्मिका आणि विजयच्या लग्नाबद्दल अंदाज लावत आहेत. काही वृत्तांमध्ये असा दावा केला आहे की हे कपल फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहेत. लग्नाच्या सर्व चर्चांमध्ये, रश्मिका मंदान्ना अलीकडेच तिच्या गर्ल गँगसोबत श्रीलंकेच्या ट्रिपवर गेली होती. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो बॅचलरेट पार्टी असल्यासारखे वाटतं होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com