Authorities inspect school transport vehicles after reports of reckless and intoxicated drivers putting students' lives at risk in Chhatrapati Sambhajinagar. saam tv
महाराष्ट्र

मद्यधुंद रिक्षाचालकाचा मुलांच्या जीवाशी खेळ; रिक्षा-स्कूल व्हॅन बनल्या खुराडा

Action Against Drunken Rickshaw Drivers : छत्रपती संभाजीनगरमध्ये मद्यधुंद रिक्षाचालकांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं समोर येताच.आता परिवहन विभाग अॅक्शन मोडवर आलाय.मात्र राज्यात रिक्षा आणि स्कूल व्हॅन चालकांकडून विद्यार्थ्य़ांच्या जीवाशी कसा खेळ सुरु आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

मद्यधुंद रिक्षाचालकाचा हा माज नीट पाहा.छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्याचा जीव धोक्यात घालणाऱ्याचा धक्कादायक प्रकार या रिक्षाचालकांनं केलं.साम टिव्हीनं ही बातमी लावून धरल्यावर झोपलेले पोलीस प्रशासन आणि परिवहन विभाग खडबडून जागं झालं.मद्यधुंद रिक्षाचालकावर कारवाई करण्यात आली.

दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपुरा भागात वाहतुक पोलिसांनी चक्रं फिरवत शाळा भरण्याच्या वेळेतच तपासणी मोहीम हाती घेतली.मात्र त्याचवेळी 4 सीटर रिक्षातून 8 ते 9 लहान मुलांना कोंबड्या-बकऱ्यांसारखं कोंबून नेलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार साम टिव्हीच्या समोर आला. रिक्षातच नव्हे तर स्कूल व्हॅनमध्येही क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबून मुलींच्या सुरक्षेशी खेळ करण्याचा प्रकार समोर आलाय. स्कूल व्हॅनमधून 60 ते 65 विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतुक सुरु असल्याचं निदर्शनास येताच RTOनेही कारवाईची भूमिका घेचलीय.

केवळ संभाजीनगरातच नव्हे तर कोल्हापुरातही हीच स्थिती आहे. ज्या रिक्षेत केवळ 6 ते 8 मुलं बसणे अपेक्षित आहे, तिथे अक्षरशः 12 ते 18 मुलांना कोंबून शाळेत नेले जात असल्याचे साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालेत. मात्र या धोकादायक वाहतुकीची ना शाळा प्रशासनाला याची काळजी, ना आरटीओला याचे सोयरसुतक. नागपुरातही 24 सीटर बसमध्ये 30 मुलं कोंबल्याचा प्रकार समोर आलाय.

ज्यामुळे पालकांनीही स्कूल व्हॅनमधील वाहतुकीवर नाराजी व्यक्त केलीय. दुसरीकडे अमरावतीत तब्बल 56 स्कूल बसेस आणि व्हॅन कोणत्याही वैध 'फिटनेस प्रमाणपत्रा'शिवाय हजारो विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचं समोर आलयं. त्यामुळे आरटीओच्या नोटिसीलाही केराची टोपली दाखवणाऱ्या या बस चालकांवर आता कारवाई सुरू झालीय.

सोलापूरमध्ये तर वाहतूक नियमांचे अक्षरशः तीनतेरा वाजवण्यात आलेत. एकाच रिक्षेमध्ये तब्बल 20 लहान मुलांना कोंबड्या-बकऱ्यांसारखं कोंडण्यात आलं होतं. काही मुलांच्या स्कूल बॅगा रिक्षेच्या बाहेर हवेत लटकत होत्या. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या संपूर्ण गंभीर प्रकारात जेवढी चूक बेजबाबदार वाहनचालकांची आणि सुस्त प्रशासनाची आहे, तितकीच मोठी चूक पालकांची आणि शाळा प्रशासनाची आहे.

आपल्या पाल्यांना मृत्यूच्या सापळ्यात कोंबून पाठवताना पालक इतके गाफील कसे राहू शकतात? तर वेळेवर फी घेणारी शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा कशीकाय दुर्लक्ष करू शकते? मुलांच्या जीवाशी सुरु असलेला हा खेळ नेमका कधी थांबणार? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईची लाईफलाईन की डेथलाईन? लोकलमध्ये गुंडांचा धुडगूस, रेल्वे पोलीस झोपलेले

Maharashtra News Live Update: शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल

सोनम वांगचुंक यांच्या उपोषणाला दीपिकाचं समर्थन? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Friday Horoscope: अनावश्यक खर्च टाळणं तुमच्या फायद्याचं असेल, शुक्रवारचा दिवस 5 राशींसाठी ठरणार लकी

अकोला-खंडवा रेल्वेमार्गामुळे खरीप बुडाला; रेल्वेच्या कारभारामुळे शेतकरी उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT