Bharat Jadhav
लग्नानंतर काही वर्षांतच अनेकदा आयुष्यात बदल घडतात. कामाचा ताण, घरगुती जबाबदाऱ्या आणि दैनंदिन धावपळ यांमुळे जोडप्यांना अनेकदा एकमेकांसाठी वेळ काढणे कठीण जाते. हळूहळू, नात्यातील सुरुवातीची ऊब कमी होऊ लागते.
चांगले नाते टिकवून ठेवण्यासाठी महागड्या भेटीगाठी किंवा भव्य सरप्राईजेस आवश्यक असतात असे लोकांना अनेकदा वाटते, मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, प्रेमाने बोललेले काही शब्दही नात्यात नवचैतन्य निर्माण करू शकतात.
जर तुम्हाला तुमचे नाते नेहमी आनंदी राहावे असे वाटत असेल, तर तुमच्या जोडीदाराला दररोज या ५ गोष्टी नक्की बोला.
लग्नानंतर बरेच लोक "माझं तुझ्यावर प्रेम आहे" असं म्हणणं सोडून देतात. मात्र हे तीन छोटे शब्द तुमच्या जोडीदाराला तुमच्या आयुष्यात त्यांचं महत्त्व आजही तितकंच आहे. त्यामुळे तुमचं प्रेम व्यक्त करायला कधीही संकोच करू नका.
दिवसभराच्या धावपळीनंतर, आपल्या जोडीदाराला ते कसे आहेत, हे नक्की विचारा. ते जे काही सांगतील ते लक्षपूर्वक ऐकून घ्या. यामुळे त्यांना असे वाटेल की, तुम्हाला केवळ त्यांचीच नाही, तर त्यांच्या भावनांचीही काळजी आहे.
तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीही केले असेल—मग ते लहान असो वा मोठे—त्यांचे आभार नक्की माना. मग के बाजारातून भाजी आणणं असेल किंवा घरकामात मदत केली असेल तरी त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांचे कौतुक करा.
आपल्या जोडीदाराने आपल्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्या कामाची कदर करावी, असे प्रत्येकालाच वाटते त्यामुळे त्यांच्या कष्टाचे किंवा अगदी छोट्या-छोट्या यशाचे कौतुक करताना "मला तुझा अभिमान वाटतो" असे म्हणा.
जोडीदार तुमच्या जीवनात असणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे, याची त्यांना वेळोवेळी जाणीव करून देत राहा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण महत्त्वाचे आहोत असे वाटते, तेव्हा नात्यात जवळीक आणि विश्वास वाढत असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.