Tilache Laddu Recipe: थंड वातावरणात झटपट बनवा शरीराला उब देणारे पौष्टिक तिळाचे लाडू, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

२ कप पांढरे किंवा काळे तीळ, १ कप गूळ, २ चमचे तूप आणि आवडीनुसार काजू-बदाम घ्या.

Tilache Laddu Recipe | Saam Tv

तीळ भाजून घ्या

कढई गरम करून त्यात तीळ घाला. मंद आचेवर तीळ हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. तीळ जळणार नाहीत याची काळजी घ्या.

Tilache Laddu Recipe | Saam Tv

सुका मेवा तयार करा

काजू-बदाम किंवा आवडीनुसार सुका मेवा बारीक चिरून घ्या. यामुळे लाडूंना छान कुरकुरीतपणा आणि चव येते.

Tilache Laddu Recipe | Saam Tv

गुळाचा पाक बनवा

कढईत थोडे तूप घालून गूळ वितळवा. गूळ पूर्ण वितळल्यानंतर त्याचा घट्ट पाक तयार होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.

Tilache Laddu Recipe | Saam Tv

सर्व साहित्य एकत्र करा

गुळाच्या पाकात भाजलेले तीळ आणि चिरलेला सुका मेवा घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव होईपर्यंत पटकन ढवळा.

Tilache Laddoo | GOOGLE

लाडू वळून घ्या

मिश्रण थोडे कोमट असतानाच हाताला तूप लावून छोटे-छोटे लाडू वळून घ्या. मिश्रण थंड झाल्यास लाडू वळणे कठीण होऊ शकते.

Til Ladoo Recipe | Instagram

लाडू साठवून ठेवा

लाडू पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. हे लाडू काही दिवस सहज टिकतात आणि चहासोबतही स्वादिष्ट लागतात.

Tilache Laddu Recipe | Saam Tv

Rinku Rajguru: नाजूक टिकली, मोकळे केस अन् पांढरी साडी; रिंकू राजगुरूचा सोज्वळ शृंगाराची भुरळ

Rinku Rajguru
येथे क्लिक करा