Pushpa 2 SAAM TV
महाराष्ट्र

Cops Arrested Smuggler: पुष्पा २ बघायला गेला अन् पोलिसांच्या कचाट्यात सापडला; नागपूरच्या तस्कराच्या आवळल्या मुसक्या

Nagpur cops arrest smuggler while watching Pushpa 2: पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात तस्कराला पुष्पा २ ची नशा, थिएटरमध्ये गेला, पोलिसांनी गुंगीच उतरवली

Bhagyashree Kamble

नागपूरातील एका सिनेमागृहात पुष्पा २ चित्रपट पाहत असताना, खून आणि पदार्थ तस्करी प्रकरणात वाँटेड असलेल्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशाल मेश्राम असं आरोपीचं नाव असून, पोलिसांनी त्याला सिनेमागृहातूनच अटक केलं आहे. सिनेमागृहात आरोपीला अटक केल्यानंतर प्रेक्षकांना धक्काच बसला. मात्र, अटक केल्यानंतर पोलिसांनी 'आता प्रेक्षकांना चित्रपटाचा आनंद लुटता येईल', असे सांगितले.

पाचपावली पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यानं रविवारी सांगितले की, विशाल मेश्राम १० महिन्यांपासून फरार होता. गुडांचे खून आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसह त्याच्यावर २७ गुन्हे दाखल आहेत. यासह आरोपीने यापूर्वी पोलिसांवरही हल्ले केलेले आहेत. आरोपी वापरत असलेल्या स्पोर्ट्स युटिलिटी वाहन (एसयुव्ही)वरही सायबर पाळत ठेवून होते.

कु्ख्यात आरोपी विशाल मेश्राम हा साथीदारांसोबत पुष्पा २ चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात गेला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पुष्पा २ चित्रपटाची तिकीट खरेदी केली. नंतर त्याच्या वाहनाच्या टायरमधून हवा काढली. जेणेकरून आरोपी पुन्हा हातातून निसटू नये आणि पलायन करू नये. जेव्हा पोलीस सिनेमागृहात दाखल झाले, तेव्हा आरोपी चित्रपट बघण्यात पूर्णपणे मग्न होता.

आरोपी बसलेल्या सीटच्या मागील बाजूस पोलीस बसले होते. तसेच बाकीचे पोलीसपथक सिनेमागृहाच्या बाहेर तैनात होते. आतापर्यंतच्या आरोपीची पार्श्वभूमी पाहता, तो पोलिसांवर हल्ला करतो. त्यामुळं पोलिसांनी विशेष खबरदारी घेऊन आरोपीला अटक केलं आहे. मेश्राम सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून, त्याला लवकरच नाशिक कारागृहाच हलविण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT