Dhule Police : लॉजमधून चार बांगलादेशी नागरिक ताब्यात; तीन महिलांचा समावेश

Dhule news : धुळे शहरात झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे नागरिक बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये काही लोकांशी संपर्कात असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली
Dhule Police
Dhule PoliceSaam tv
Published On

धुळे : धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खाजगी लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका पुरुषासह तीन महिलांचा समावेश आहे. तर अन्य दोन बांगलादेशी नागरिक फरार झाल्याची माहिती समोर आली असुन धुळे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

धुळे शहरात झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे नागरिक बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये काही लोकांशी संपर्कात असल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे. एका वर्चुअल ॲपद्वारे हे बांगलादेशमध्ये संपर्क साधत असल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे. धुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने सदरची कारवाई केली आहे.  

Dhule Police
Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; भरत गोगावलेंचे लागले बॅनर, तटकरे गटाचाही दावा

आणखी काहीजण असल्याची शक्यता 

धुळे पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यासोबत आणखी काही बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे फरार असल्याची माहिती समोर येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान या कारवाईमुळे मात्र शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Dhule Police
Erandol Accident : काही अंतरावर घर असतानाच दोघांना मृत्यूने गाठले; भरधाव टँकर काळ बनून आला


बनावट पिस्तूल बाळगणारे दोघे ताब्यात 
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघा बाईकस्वारांकडून गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत केले असून, दोन जिवंत कार्तुस देखील या दोघांकडून पोलिसांनी हस्तगत केले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सोनगीर टोल नाका येथे या बाईकस्वारांची तपासणी केली. या तपासणीत त्यांच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पोलिसांनी या दोघाना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतूस हस्तगत केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com