Erandol Accident : काही अंतरावर घर असतानाच दोघांना मृत्यूने गाठले; भरधाव टँकर काळ बनून आला

Jalgaon News : जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाल्याने जखमींला ग्रामीण रुग्णालयात नेत असताना, त्याचाही मृत्यू
Erandol Accident
Erandol AccidentSaam tv
Published On

एरंडोल (जळगाव) : रात्री घरी जाण्यासाठी दुचाकीने निघालेल्या दोघांना भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान दुचाकीला धडक दिल्यानंतर टँकरसह चालक फरार झाला असून अपघात झाल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला. 

एरंडोल येथे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अमळनेर नक्याजवळ  अपघात झाला. यात राजेंद्र भिला भोई (वय ४६) आणि दीपक रामकृष्ण भोई (वय ४४, रा. शिरसोली, ता. जळगाव) हे दोघे दुचाकीवरून जात होते. याचवेळी जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा एक जण गंभीर जखमी झाल्याने जखमींला ग्रामीण रुग्णालयात नेत असताना, त्याचाही मृत्यू झाला. 

Erandol Accident
Banana Export : परांड्यातील केळी इराण-इराकला जाणार, भाव किती मिळाला?

अपघातात मृत झालेले दोघेही जवळचे नातेवाईक होते. बसस्थानकापासून केवळ पाचशे मीटर अंतरावर अपघात झाल्यामुळे नागरिकांनी अपघातस्थळी लागलीच गर्दी करून मदत कार्य सुरू केले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. महामार्गावरच अवजड वाहन आडवे लावून वाहतूक रोखून धरली. 

Erandol Accident
Raigad Politics : रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; भरत गोगावलेंचे लागले बॅनर, तटकरे गटाचाही दावा

यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. याठिकाणी यापूर्वीही अनेकवेळा अपघात झाले असून, अपघाती जागा म्हणून या जागेची ओळख झाली आहे. अमळनेर नाका येथून नवीन वसाहतींमध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. महिन्यापूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन युवक ठार झाला होता. राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाका परिसरात अंडरपास करावा अथवा उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com