Drone Found on Hill Near Kasara Saam Tv
महाराष्ट्र

Drone: कसाऱ्याजवळ डोंगरावर आढळला ड्रोन, परिसरात उडाली खळबळ

Drone Found on Hill Near Kasara: शहापूरमध्ये कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन सापडले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पोलिसांनी हे ड्रोन ताब्यात घेतले आहे.

Priya More

फैय्याज शेख, शहापूर

शहापूर तालुक्यातील कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन पडल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शहापूरमध्ये एकच खळबळ उडाली. फुगाळे गावाच्या डोंगरावर हे ड्रोन पडलेल्या अवस्थेत सापडले. या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ड्रोन ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुगाळे गावानजीकच्या डोंगरावर ड्रोन पडलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आले. त्यामुळे आसपासच्या गावामध्ये एकच खळबळ उडाली. गावाकऱ्यांनी या ड्रोनबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रथामिक माहितीनुसार हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असल्याचे समजते.

पोलिसांनी सांगितले की, कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अतिदुर्गम भागातील फुगाळे गावानजीकच्या सह्याद्रीच्या डोंगरावर गावातील काही तरूण फिरायला गेले होते. त्यावेळी या डोंगरावर ड्रोन पडलेल्या अवस्थेत गावकऱ्यांना दिसून आले. सदर गावकऱ्यांनी कसारा पोलिसांशी संपर्क साधाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी या ड्रोनची तपासणी केली. हा ड्रोन जलसंपदा विभागाचा असल्याची प्राथमिक माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर कसारा पोलिसांनी हा ड्रोन ताब्यात घेतला असून पुढील तपास करत आहेत. दरम्यान, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेतेच्या दृष्टीने राज्यभरात सगळीकडेच ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुरबाडमध्ये MIDC च्या जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

उज्जैनच्या मंदिरात चेंगराचेंगरीची स्थिती; नागचंद्रेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; ३ जण जखमी

Income Tax च्या ऑफिसला भीषण आग; परिसरात धराचे लोट, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी|VIDEO

भेसळयुक्त साखर कशी ओळखायची? घरी या’ 3 सोप्या स्टेप्सने करा चेक

Rahul Gandhi : राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; कारवाई थांबवण्याचे हायकोर्टाला आदेश, ईडी-सीबीआयलाही थेट सांगितलं

SCROLL FOR NEXT