ambulance
ambulance saam tv
महाराष्ट्र

108 रुग्णवाहिका सेवेच्या चालकांना हवी पगार वाढ; आजपासून काम बंद आंदाेलन सुरु

साम न्यूज नेटवर्क

- राजेश भोस्तेकर

रायगड : रायगड (raigad) जिल्ह्यातील १०८ क्रमांकावर (108 ambulance) धावणाऱ्या रुग्णवाहिकेची (ambulance) सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. नियमित वेतन, कोरोना (corona) काळातील बोनस आणि वेतनवाढ मिळावी यासाठी रुग्णवाहिका चालकांनी मागील महिन्यात निवेदन दिले होते. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी रुग्णवाहिका चालक संपावर (strike) गेले आहेत. (raigad latest marathi news)

या संपात सुमारे ५५ चालक सहभागी झाले आहेत. त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान संप काळात गरोदर महिला आणि अपघात ग्रस्तांसाठी सेवा सुरू राहील असेही चालकांनी नमूद केले आहे.

रागड जिल्ह्यात १०८ क्रमांकच्या अधिपत्याखाली २३ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्या बिव्हीजी कंपनीतर्फे (BVG) चालवल्या जातात. या कंपनी प्रशासनास आम्ही विविध मागण्यांचे निवेदन दिलं हाेते. परंतु त्याकडे लक्ष न दिल्याने आंदोलन करीत आहाेत असे चालकांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Wedding Card: देवा रे देवा! लग्नात येणाऱ्यांसाठी १५ 'खतरनाक' नियम, वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात; डेंजर पत्रिका पाहाच!

Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंगचा मालक भावेश भिंडे कोण आहे?, 2009 मध्ये लढवली विधानसभा निवडणूक

Face Care Tips: त्वचेला सीरम लावण्यापूर्वी ही काळजी घेताय ना?

Akola News : संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : धक्कादायक माहिती आली समोर; कस्टडी रूमचा सीसीटीव्ही होता बंद

Mumbai Local News : लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...

SCROLL FOR NEXT