Manpada Police Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News : चोरी करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला; दोन सराईत चोरट्याना अटक

Dombivali News : घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी हे उत्तर प्रदेश येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

डोंबिवली : वेगवेगळ्या ठिकाणी बंद असलेल्या घरात प्रवेश करत चोरी करायचे. चोरी केलेल्या रक्कमेतून (dombivali) चोरट्यांनी उत्तर प्रदेशमध्ये मोठा आलिशान बंगला बांधून राहत होते. या चोरट्याना मानपाडा (Police) पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.  

डोंबिवली मानपाडा पोलीस (Manpada Police) ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या. या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींना शोधण्यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. या आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांना घरफोडी (Theft) करणारे दोन सराईत आरोपी हे उत्तर प्रदेश येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाले. हे दोन्ही चोरटे उत्तर प्रदेश येथील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील किशुंधरध ज्योत या गावी लपून बसले असल्याची माहिती मिळाली. 

२२ लाख ७७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत 

स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिस पथकाने माहिती मिळालेल्या एका घरावर रात्री एक वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्या घरातून राजेश कहार याला अटक करण्यात आली. राजेश याने सांगितलेल्या माहितीनुसार  चिंटू निषाद च्या घरी देखील पोलिसांनी तासाभरात छापा टाकला. या दोघांच्या घरातून दागिने हस्तगत केले. दोघांनी गावात आलिशान बंगला तयार केला होता. या दोघांकडून सोन्या-चांदीचे दागिने मिळून २२ लाख ७७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे दोघे सराईत गुन्हेगार असून या दोघांनी डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई व ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल २४ गुन्हे केल्याची माहिती समोर आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politcs : कुछ बडा होने वाला है! दिल्लीत महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला, पडद्यामागं काय घडतंय? VIDEO

Unnao Hit-and-Run: आमदाराच्या कारनं दुचाकीस्वाराला उडवलं; रेल्वे पुलावरून खाली कोसळून भाजप नेत्याच्या भावाचा मृत्यू

Shocking : धक्कादायक! एम्समधील नर्सच्या दोन चिमुकल्यांना घरात जिवंत जाळलं; आईनं हंबरडा फोडला

Maharashtra Live News Update: एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक, सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त

Shocking : २८ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT