Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime: दारू पिताना खुर्चीला लागला धक्का; वादात पिस्तुल काढत झाडली गोळी, एक जखमी

Dombivali News : डोंबिवली मानपाडा परिसरात असलेल्या सेवन स्टार या बारमध्ये रात्रीच्या सुमारस अजय सिंग हा मित्रांसोबत दारू पीत होता.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: बारमध्ये दारू पित असताना खुर्चीला धक्का लागल्याने दोन गटात वाद झाला. हा वाद इतका (Dombivali) विकोपाला गेला की एकाने पिस्तुल काढून दुसऱ्या गटातील एका तरुणावर गोळी झाडली. सुदैवाने हा तरुण यातून बचावला (Crime News) किरकोळ जखमी झाला आहे. हा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे.  (Maharashtra News)

डोंबिवली मानपाडा परिसरात (Dombivali Crime News) असलेल्या सेवन स्टार या बारमध्ये रात्रीच्या सुमारस अजय सिंग हा मित्रांसोबत दारू पीत होता. त्याच्याच बाजूचा टेबलवर विकास भंडारी हा देखील आपल्या मित्रासोबत दारू पीत बसला होता. पार्टी रंगात आली असताना खुर्चीला धक्का लागल्याने अजय सिंग व विकास भंडारी या दोघांमध्ये वाद सुरू झाला. सिंग याने संतापाच्या भरात आपल्या जवळील पिस्तुलाने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी विकासाच्या खांद्याला लागली. या हल्ल्यात विकास बचावला असला तरी जखमी झाला आहे, 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटना घडल्यानंतर अजय सिंग व त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने तपास सुरू केला. मानपाडा पोलिसांच्या पथकाने अवघ्या तासाभरात पळून गेलेल्या पाच आरोपींचा पाठलाग करत ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी  मानपाडा पोलीस ठाण्यात अजय सिंगसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: उद्या बनणार पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींचा पैसा आणि संपत्ती दुप्पटीने वाढणार

Makar Sankranti 2026: केवळ फॅशन म्हणून नाही तर का घालतात संक्रांतीला हलव्याचे दागिने? जाणून घ्या खरं कारण

जिल्हा परिषद, पंचायत समितीचा शंखनाद! कधी आणि कोणती निवडणूक होणार? जाणून घ्या A टू Z माहिती|VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबई नेरुळमध्ये अडीच लाख रुपये जप्त; मतदारांच्या यादीसह एकाला ताब्यात

Municipal Election 2026: प्रचाराची मुदत संपली, तरी उमेदवाराला घरोघरी प्रचार करता येणार; निवडणूक आयोगाचा अजब निर्णय

SCROLL FOR NEXT