jayakwadi dam water issue saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : 'जायकवाडी' प्रश्नी भाजप नेत्यासह शेतक-यांची सर्वाेच्च न्यायालयात धाव (पाहा व्हिडिओ)

मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर 20 नोव्हेंबरला राज्य शासन आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ त्यांचे म्हणणे मांडण्याची शक्यता आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील धरणातून मराठवाड्याला पाणी साेडण्यास स्थगिती द्यावी या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मराठवाड्यापेक्षा नाशिक येथे जास्त दुष्काळ असल्याचा दावा शेतक-यांनी याचिकेत केला आहे. (Maharashtra News)

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या दाेन्ही जिल्ह्यातील धरणांमधून ८.६० टीएमसी इतके पाणी जायकवाडीली साेडले जाणार आहे. दरम्यान या निर्णया विराेधात नाशिक आणि नगर जिल्ह्यातील शेतक-यांसह लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला आहे. काहींनी जायकवाडीसाठी पाणी देऊ नये यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची पुढील सुनावणी पाच डिसेंबरला हाेणार आहे.

दरम्यान भाजप नेत्या अमृता पवार (bjp leader amruta pawar) यांच्या पुढाकाराने आता थेट सर्वाेच्च न्यायालयात पाणी प्रश्नावर याचिका दाखल करण्यात आली आहे. साम टीव्हीशी बाेलता अमृता पवार म्हणाल्या नाशिक जिल्ह्यात खूप कमी पाऊस झाला. पावसाची आकडेवारी पाहिल्यास संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड या जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांना शेतीसाठी, जनावरांसाठी पाणी नाही. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. त्यासाठी आम्ही सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतल्याचे पवार यांनी नमूद केले.

याबराेबरच लहानू मेमाणे, नामदेव डांगले आणि शरद शिंदे या याचिकाकर्त्यांनी मेंढीगिरी अहवालाची पुनर्रचना करण्याची मागणी केली. ते म्हणाले समान पाणी वाटप कायदा यामध्ये नाशिक जिल्ह्याचा विचार झालेला नाही. तसेच 30 ऑक्टोबर 2023 ला कार्यकारी संचालकांनी आदेश काढला आहे. त्यातही नाशिक जिल्ह्याचा याेग्य विचार झालेला नाही.

नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर हाेणे आवश्यक हाेते. अन्य जिल्ह्यांपेक्षा नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. जालना, बीड, परभणी यापेक्षा निफाड, सिन्नर, येवला या तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडीला पाणी दिले जाऊ नये यासाठी आम्ही सर्वाेच्च न्यायलयात धाव घेतल्याची माहिती शेतक-यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT