Maharashtra Politics : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात यादवी माजेल : विनायक राऊत

दाेन्ही समाजात दुरावा कसा निर्माण होईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे असेही खासदार विनायक राऊत यांनी नमूद केले.
mp vinayak raut
mp vinayak rautsaam tv
Published On

Ratnagiri News : एकमेकांची डोकी फोडायला सुरुवात झाली आहे. शिंदे विरुद्ध अजित पवार गट, शिंदे विरुद्ध भाजप आणि फडणवीस विरुद्ध भुजबळ असा संघर्ष राज्यात सुरू आहे. एकमेकांची डोकी फोडून यादवी माजेल अशी चिन्हे महाराष्ट्रातील सरकारमध्ये निर्माण झाली आहेत असे मत मंत्री छगन भूजबळ (chhagan bhujbal) यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले. (Maharashtra News)

mp vinayak raut
Maratha Aarakshan : मनाेज जरांगे पाटलांना धमकविणा-या नितेश राणेंची मराठा समाजाने दखल घ्यावी : खासदार विनायक राऊत

खासदार विनायक राऊत म्हणाले मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्र राज्याने त्या संदर्भातला ठराव करून पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे पाठवावा असेही राऊत यांनी म्हटले. केंद्रातील प्रमुख नेत्यांची भेट घ्यावी.

केंद्रातील अधिवेशनात मराठा आणि धनगर आरक्षण संदर्भातला ठराव करावा. केवळ न्यायालयाच्या निर्णयावर विसंबून चालणार नाही असेही खासदार विनायक राऊत यांनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपच ओबीसींना न्याय देऊ शकेल असे पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणतात या प्रश्नावर खासदार राऊत म्हणाले मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे काम भाजप करत आहे. दाेन्ही समाजात दुरावा कसा निर्माण होईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे असेही राऊत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

mp vinayak raut
सरकारी कर्मचाऱ्यानं स्वतःला संपवण्याचा केला प्रयत्न; पत्नीची पोलिसांत तक्रार, भाजप आमदारावर गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com