Shambhuraj Desai, Dr. Bharat Patankar, Satara, Koyna Dam Project Affected People saam tv
महाराष्ट्र

Shambhuraj Desai News : कोयना प्रकल्पग्रस्तांचे १९ जूनला आंदोलन; शासन सकारात्मक, शंभूराज देसाईंनी मांडला लेखा-जाेखा

शासन करीत असलेल्या प्रयत्नांची वस्तुस्थिती प्रकल्पग्रस्तांना देऊन सहकार्य करावे.

Siddharth Latkar

Satara News : शासन कोयना प्रकल्पग्रस्तांप्रती (Koyna Dam Project Affected People) संवेदनशील व सकारात्मक असल्यामुळे मागील तीन महिन्यात कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न वेगाने निकाली काढण्याप्रती असलेले उत्तरदायित्वाचे गांभीर्याने पालन करीत असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांनी सातारा येथे दिली. दरम्यान काेयना प्रकल्पग्रस्त व त्यांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी येत्या १९ जूनला आंदोलन करू नये असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. (Maharashtra News)

पालकमंत्री देसाई म्हणाले मागील तीन महिन्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी डॉ. भारत पाटणकर (dr. bharat patankar) यांच्या समवेत १३ मे रोजी पाटण येथे समक्ष चर्चा करून याकामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही दिली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उच्चाधिकार समितीस तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते असेही देसाईंनी नमूद केले.

मंत्री देसाई म्हणाले कोयना प्रकल्पाच्या अनुषंगाने गठीत उच्चस्तरीय समन्वय समितीच्या मंत्रालय मुंबई येथे दोन बैठका माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्या होत्या. या बैठकांमध्ये प्राप्त अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिली. तसेच सातारा जिल्हयातील उपलब्ध जमीन पसंती कार्यक्रम राबवून त्याप्रमाणे तात्काळ वाटप करण्याची सूचनाही केली.

318 प्रकल्पग्रस्तांनी सांगली येथे जमीन पसंत केली त्याची पडताळणी करण्याकामी प्रस्ताव सांगलीकडून सातारा कार्यालयास प्राप्त झाला त्याबाबतची पडताळणी झालेली असून अंतिम अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांना कळविण्यात आलेला आहे.

सातारा जिल्हयातील फलटण, दहिवडी व खटाव तालुक्यात श्रमिक मुक्ती दलाच्या मागणी प्रमाणे पसंती कार्यक्रम राबविला त्यानुसार मागील ३ दिवसात ७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याबाबत पुढील महिन्याभरात कार्यवाही पूर्ण होईल व वाटप प्रकिया सुरळीत होईल असेही देसाईंन नमूद केले.

१९ जूनला आंदोलन करू नये : पालकमंत्र्यांचे आवाहन

शासन आपल्या स्तरावरुन कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रत्येक शक्य ते पाऊल उचलत असताना डॉ. भारत पाटणकर यांनी शासन करीत असलेल्या प्रयत्नांची वस्तुस्थिती प्रकल्पग्रस्तांना देऊन सहकार्य करावे. येत्या १९ जून रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला स्थगिती द्यावी असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT