Maratha Aarakshan New
Maratha Aarakshan New Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan New: माझ्यावर अंत्यविधी करू नका...; आत्महत्येआधी लिहिली सुसाईड नोट, मृतदेह ताब्यात घेण्यास कुबेर कुटुंबियांचा नकार

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

Maratha Reservation:

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपतगाव येथील २८ वर्षीय गणेश कुबेर या तरुणाने काल आत्महत्या केली होती. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यविधी करू नका अशा पद्धतीची सुसाईड नोट तरुणाने लिहिली होती. त्यानंतर कुबेर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलेला आहे.

सध्या मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडूनये तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊनये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त घाटी शवविच्छेदन गृह परिसरात तैनात करण्यात आला आहे.

पंढरपूरच्या गादेगावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश करू देणार नाही, अशी शपथ पंढरपूर जवळच्या गादेगाव येथील मराठा समाजाने घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून येथील मराठा बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय ही घेतला आहे.

मराठा आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्येसह सर्वत्र आंदोलन सुरू आहे. माढ्याच्या जामगावात देखील अंध तरुणाने अर्धसमाधी घेत आंदोलन केलंय. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माढा तालुक्यातील जामगाव येथील अंध असलेल्या मालोजी चव्हाण या तरूणाने स्वतःला मातीमध्ये गाडून घेत अर्धसमाधी आंदोलन सुरू केले आहे.‌ आज सकाळपासून सुरू केलेल्या आंदोलनाला प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

Singapore Corona News |चिंता वाढली! सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर

Yogi Adityanath: मोदी तिसऱ्यांदा PM झाल्यास 6 महिन्यात POK भारताच्या ताब्यात असेल, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT