Flight Rate Hike News  AI Image
महाराष्ट्र

Flight Fare Hike : विमान प्रवास महागला, दिवाळीपूर्वी तिकिटाच्या दरात ४ पटीने वाढ, प्रवासासाठी किती मोजावे लागणार?

Fastival Flight Fare Hike : दसरा-दिवाळीपूर्वी विमान भाड्यात मोठी वाढ झाली आहे. नागपूर-मुंबई तिकीट दर २२,८०० रुपयांपर्यंत पोहोचले असून पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली प्रवासही महागला आहे.

Alisha Khedekar

  • दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूरहून प्रमुख शहरांना जाणाऱ्या विमानांच्या भाड्यात मोठी वाढ

  • नागपूर-मुंबई विमान तिकिटांचे दर २२ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचले

  • पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली मार्गांवरील विमान प्रवासही महागला

  • वाढती प्रवासी मागणी आणि तिकिटांची उपलब्धता यांचा विमान भाड्यावर परिणाम

दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाली असून, विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे चित्र आहे. नागपूरहून मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद आणि दिल्लीसह प्रमुख शहरांना जाणाऱ्या विमानांचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सणासाठी गावी जाणाऱ्या तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नागपूर-मुंबई विमान प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल २२ हजार ८०० रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागत आहे. मुंबईहून नागपूरला येण्यासाठीही विमान तिकिटांचे दर १५ हजार ते २२ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मुंबई आणि नागपूरदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. पुणे-नागपूर मार्गावरील विमान तिकिटांसाठी १२ हजार ते १५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. तर बंगळुरू-नागपूर मार्गावरील विमान प्रवासाचे दर १५ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. नागपूर-हैदराबाद प्रवासासाठी १३ हजार ते १७ हजार रुपये भाडे आकारले जात असून, दिल्ली-नागपूर मार्गावरील विमान तिकिटाचा दर सुमारे १७ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

विशेष म्हणजे, सामान्य दिवसांमध्ये याच मार्गांवर विमान प्रवासासाठी साधारणतः पाच ते सात हजार रुपये खर्च येतो. मात्र, सणासुदीच्या काळात वाढणारी प्रवाशांची संख्या आणि तिकिटांची वाढती मागणी यामुळे विमान भाड्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, ऐन सणासुदीत प्रवासाचे नियोजन करणाऱ्या नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

दसरा-दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी अनेक जण आपल्या मूळ गावी जातात. काही जण पर्यटनासाठी, तर काही जण नोकरी आणि व्यवसायानिमित्त प्रवास करतात. एकीकडे सणासुदीच्या काळात प्रवासाची मागणी वाढत असताना, दुसरीकडे विमान भाड्यात झालेली वाढ सर्वसामान्य प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोनं ३५०० तर चांदी ९ हजारांनी घसरली; सुवर्णनगरीत गर्दीचा महापूर

Maharashtra News Live Update: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींचा शरद पवारांना फोन; प्रकृतीची केली विचारपूस

Vasai Panvel Local: पनवेल ते वसई लोकल सुरू होणार, 17 स्थानकांचा असणार रेल्वे मार्ग; 12 हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे

Ramayana Movie Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! पहिल्याच दिवशी छफरफाड कमाई, 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या! पत्नीसह सासरच्यांना संपवून मृतदेह विविध ठिकाणी फेकले; हादरवणारी घटना

SCROLL FOR NEXT