Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांचा सरपंच अन् सदस्यांना दणका; 214 जणांचे सदस्यत्व रद्द

बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना चांगलाच दणका दिला आहे.

विनोद जिरे

Beed News Today: बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना चांगलाच दणका दिला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव प्रभागातून निवडून आल्यानंतरही, मुदतीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने, जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. हे सदस्य 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आले होते. यात काही सरपंचांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

तर नियमाने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागांवर निवडून आल्यानंतर 12 महिन्यांच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले होते. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये राखीव जागांवरून निवडून आलेल्या उमेदवारांना कोरोनामुळे (Corona) जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही या सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही.

तर वारंवार संधी देऊनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याचा अहवाल स्थानिक तहसीलदारांनी दिल्यानंतर जिल्हाधिकरी दीपा मुधोळ यांनी, जिल्ह्यातील तब्बल 214 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय दिला आहे. (Beed News)

दरम्यान बीड (Beed) जिल्ह्यात एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायत सदस्य अपात्र होण्याची ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळं आता जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर अनेक ग्रामपंचायतींमधील सत्तेचे गणित देखील बदलणार आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण ढवळून निघणार असून सत्तेचे गणितं जुळवण्यासाठी आता धावपळ आणि पळापळ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT