Ambernath News: अंमली पदार्थ न मिळाल्यानं तरुणाने संपवलं आयुष्य; कारवाई करण्याची पालकांची मागणी

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मृत तरुणाच्या पालकांनी केली असून पोलिसांनी मात्र अंमली पदार्थांची विक्री होतच नसल्याचा दावा केला आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On

Ambernath News: अंमली पदार्थ न मिळाल्यानं एका २२ वर्षीय तरुणानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. यानंतर अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मृत तरुणाच्या पालकांनी केली असून पोलिसांनी मात्र अंमली पदार्थांची विक्री होतच नसल्याचा दावा केला आहे. (Latest Marathi News)

अंबरनाथ पश्चिमेच्या भगतसिंग नगर परिसरात सलीम शेख हे त्यांच्या परिवारासह वास्तव्याला आहेत. टेलरिंगचं काम करून सलीम हे त्यांचं घर चालवतात. सलीम यांचा मुलगा अरमान शेख याला सोल्युशन या नशेचं व्यसन होतं. तो राहत असलेल्या भगतसिंग नगरमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री केली जाते.

Crime News
Nagpur Rain: विदर्भात पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज, नागपूर वेधशाळेने व्यक्त केला अंदाज

मात्र अरमान याला नशा करण्यासाठी घरून पैसे मिळत नव्हते. त्यामुळे अरमान हा सोल्युशन हा अंमली पदार्थ उधारीवर मागण्यासाठी गेला. मात्र अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याने त्याला उधार देण्यास नकार देत शिवीगाळ करून हाकलून दिलं.

त्यामुळं अरमान यानं घरी येऊन थेट गळफास घेत आत्महत्या केली. त्यानं गळफास घेतल्याची बाब लक्षात येताच त्याच्या घरच्यांनी त्याला रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भगतसिंग नगरमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अरमान याच्या कुटुंबीयांनी केली आहे. (Marathi News)

आपल्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात गेल्याचं सलीम शेख यांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी तुम्ही तुमच्या मुलाला पैसे दिले नाहीत, त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचं म्हणत आम्हाला पिटाळून लावल्याचा आरोप सलीम यांनी केलाय.

Crime News
Pune Police News: कोल्हापुरातील परिस्थिती चिघळल्यानंतर पुणे पोलिसांची सावध भूमिका, अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना

या सगळ्याबाबत अंबरनाथ पश्चिम पोलीस (Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना विचारलं असता, त्यांनीही अरमान याला त्याचे कुटुंबीय नशेसाठी पैसे देत नसल्यानं त्यांनं आत्महत्या केल्याचा दावा केला. तसंच भगतसिंग नगरमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांची विक्री होतच नसल्याचा दावाही त्यांनी केला. इतकंच नव्हे, तर अरमानचे कुटुंबीय कोणत्याही स्वरूपाची लेखी किंवा तोंडी तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आलेलेच नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

अंबरनाथ (Ambernath) पश्चिमेच्या भगतसिंग नगर, सिद्धार्थ नगर या परिसरात अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. चरस, गांजा, यासह सोल्युशन, बटन गोळ्या यांचीही विक्री या परिसरात मोठ्या प्रमाणात केली जाते. या नशेच्या आहारी परिसरातील लहान लहान मुलं सुद्धा गेली असून पोलीस मात्र या परिसरात नशेची विक्री होतच नसल्याचे दावे करत असल्यामुळे आता अरमानची आत्महत्या खोटी? की पोलीस खरे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com