Manipur News : मणिपूरमध्ये महिनाभरापूर्वी सुरू झालेला हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. रविवारी मणिपूरमध्ये घडलेल्या एका घटनेने अवघा देश हादरला आहे. इंफाळ पश्चिम जिल्ह्यात जमावाने एक अॅम्बुलन्स अडवली आणि पेटवून दिली. या दुर्दैवी घटनेत 8 वर्षीय मुलगा, त्याची आई आणि रुग्णवाहिकेतील एका नातेवाईकाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितुसार, एक महिला आपल्या आठ वर्षांच्या जखमी मुलाला घेऊन अॅम्बुलन्समधून रुग्णालयात घेऊन चालली होती. आसाम रायफल्सने संरक्षण देत अॅम्बुलन्स अनेक किलोमीटरपर्यंत नेली. यानंतर स्थानिक पोलिसांनी आपल्या सुरक्षेत अॅम्बुलन्स नेण्यास सुरुवात केली. मात्र मध्येच काही लोकांनी अॅम्बुलन्स थांबवली आणि पेटवून दिली. (Maharashtra News)
या हृदयद्रावक घटनेत जखमी मुलगा, त्याची आई आणि सोबत असलेला एक नातेवाईक अशा तिघांचा मृत्यू झाला. तोंसिंग हैंगिंग (8), मीना हैंगिंग (45) आणि नातेवाईक लिदिया लोरेम्बम (37) अशी मृतांची नावे आहे. मृत तिघेही मैतेई समाजाचे होते आणि सध्या आसाम रायफल्सच्या शिबिरात राहत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर मणिपूर शांत झालेला नाहीच. मणिपूरमधील हिंसाचारात आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. राज्यातील चिघळलेल्या परस्थितीमुळे नागरिकांना छावण्यांमध्ये राहण्याची वेळ आली आहे. एकूण 272 मदत छावण्यांमध्ये 37, 450 पेक्षा जास्त लोक सध्या राहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.