Sangli DCC Bank saam tv
महाराष्ट्र

Sangli DCC Bank: अध्यक्षांच्या दालनात संचालकांची झटापट? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रकरण पाेचले पाेलिस ठाण्यात; जीवे मारण्याची तक्रार दाखल

या घटनेनंतर बॅंकेत एकच खळबळ उडाली.

विजय पाटील

Sangli News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते या दाेघांत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतच वादावादी झाले. हा प्रकार जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांच्या दालनात झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान हे प्रकरण आता पाेलिस ठाण्यापर्यंत पाेहचले आहे. (Maharashtra News)

आटपाडी येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्यावरुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक (mansingrao naik) यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे संचालक तानाजी पाटील (tanaji patil) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख (hanmantrao deshmukh) यांच्यात खडाजंगी झाली. या वादावादीची चर्चा बॅंकेच्या वर्तुळात अवघ्या काही क्षणांत पसरली.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक मंडळाची साेमवारी दुपारच्या सुमारास बैठक होती. या बैठकीसाठी संचालक आले होते. अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कक्षात चर्चा करीत बसले होते.

प्राप्त माहितीनूसार हणमंतराव देशमुख यांनी बॅंकेच्या ताब्यात असलेला माणगंगा साखर कारखाना संचालक पाटील यांच्याशी सबंधित कंपनीला चालविण्यास देण्याबाबत तक्रार केली आहे. कोणत्या नियमाने कारखाना दिला अशी विचारणा केली.

यावरुन संचालक तानाजी पाटील यांनी अध्यक्ष मानसिंग नाईक यांच्या दालनात बसलेल्या हणमंतराव देशमुख यांना का माझ्याबद्दल तक्रारी करतो असे म्हणत शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि वादावादी सुरू झाली. एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रकारही घडला.

बँकेचे अध्यक्ष मानसिंग नाईक यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बँकेतून बाहेर पडल्यानंतर हणमंतराव देशमुख यांनी पाटील यांच्याविरुध्द जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा घसरली, आठवडाभरात इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

आजीसोबत झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण; बलात्कार करून रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

Shocking News : कर्ज न फेडल्यामुळे एजंटने मर्यादा ओलांडल्या, कर्जदाराच्या पत्नीचे 'तसले' फोटो केले व्हायरल

Indurikar Maharaj Net Worth: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची संपत्ती किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT