Shivsena office bearer Priyanka Joshi on Kunal Kamra poem Saam Tv News
महाराष्ट्र

मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांचं कार्यालय फोडणार का? ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याचा संतप्त सवाल

Dhule Thackeray Shivsena Office Bearer : कॉमेडियन कुणाल कामरा याने विडंबनात्मक गाणं गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. ही केलेली कविता आता चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

Prashant Patil

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे : कॉमेडियन कुणाल कामरा याने विडंबनात्मक गाणं गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. ही केलेली कविता आता चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानंतर कुणाल कामरा या कॉमेडीयनचे हॅबिटॅट क्लब देखील फोडण्यात आला. यावरूनच धुळे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी प्रियंका जोशी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना सवाल केलाय. जर कुणाल कामरा यांचे कार्यालय आपण एकनाथ शिंदे यांना त्यांनी गद्दार असा उल्लेख केल्यामुळे फोडणार असाल, तर यापूर्वी आपल्याला गद्दार असा उल्लेख करून आता आपल्याच मांडीला मांडी लावून बसलेल्या आमदार संतोष बांगर यांचे कार्यालय आपण फोडणार का? तसेच सदा सरवणकर, रवींद्र वायकर, मनीषा कायंदे यांचे देखील कार्यालय आपण फोडणार का? असा प्रश्न जोशी यांनी विचारला आहे.

आता सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या या सर्व मंडळींनी एकनाथ शिंदे गुवाहाटी येथे गेले असता त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता. याचदरम्यान, ठाकरे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना हा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान, कुणाल कामराने 'दिल तो पागर है' या चित्रापटातील 'भोली सी सूरत' विडंबनात्मक गाणे गायले. या गाण्यात त्याने एकनाथ शिंदेंवर टीका केली होती आणि त्यांना देशद्रोही म्हटलं होतं. कामराने कोणाचंही नाव घेतलं नाही पण ज्या पद्धतीने त्याने दाढी, ठाणे आणि रिक्षा असे शब्द वापरले त्यावरुन त्याचा रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे होता हे स्पष्ट झालंय. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड केलं होतं. त्यांनी ४० आमदारांसह बंड करत भाजपच्या पाठींब्याने सरकार स्थापन केलं होतं. त्यांनी सरकारचे नेतृत्व केलं आणि सुमारे अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केलं. त्यांच्या बंडाला उद्धव ठाकरे गटाने विश्वासघात तथा गद्दार असं म्हटलं होतं. अशा परिस्थितीत, कुणाल कामराचे शब्द ठाकरे गटाने वापरले होते, असंही शिंदे समर्थक म्हणत आहेत.

कुणाल कामराने मुंबईतील खार परिसरात असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये एक कार्यक्रम सादर केला. यावेळी कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणे गायले. जेव्हा हे गाणे व्हायरल झाले आणि शिवसैनिकांपर्यंत पोहोचले तेव्हा ते नियंत्रणाबाहेर गेले. मात्र, या प्रकरणात राजकारणही सध्या तापलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT