Maharashtra Politics: ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आधी सांगली आता पुणे आणि अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी साथ सोडली

Eknath Shinde And Uddhav Thackeray: राज्यभरात शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे. शिंदे गट एकापाठोपाठ एक ठाकरे गटाला मोठे धक्के देत आहे. सांगलीनंतर आता पुणे आणि अहमदनगरमधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे.
Maharashtra Politics: ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आधी सांगली आता पुणे आणि अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी साथ सोडली
eknath shinde news Saam tv
Published On

शिवसेना ठाकरे गटाला एकापोठापाठ एक धक्के बसत आहेत. सांगली पाठोपाठ आता पुणे आणि अहमदनगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले आहे. शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडली असून लवकच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा ठाकरेंना मोठा धक्का असून आता शिंदेसेनेची ताकद आणखी वाढणार आहेत.

पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसेच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. आज संध्याकाळी मुंबईत हे सर्वजण धनुष्यबाण हाती घेणार आहेत. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आश्विनी मल्हारे, प्रतीक्षा महाले, भक्ती जगदाळे, सुप्रिया खेडकर, समीरा प्रधान, दिपाली पोटे, नूतन शरद दिवार आणि वैजयंती फाटे हे सर्वजण शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Maharashtra Politics: ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आधी सांगली आता पुणे आणि अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी साथ सोडली
Maharashtra Politics : पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंना हादरा, जिल्हा प्रमुखांसह शेकडो शिवसैनिक शिंदेसेनेत

तर दुसरीकडे, अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज मुंबई येथे संदेश कार्ले हे हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संदेश कार्ले यांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर विधानसभेसाठी तिकीट मागितले होते मात्र त्यांना तिकीट मिळाले नव्हते त्यामुळे ते नाराज होते.

Maharashtra Politics: ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आधी सांगली आता पुणे आणि अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी साथ सोडली
Maharashtra Politics : 'जयकुमार गोरेंचा अडकवण्याचा कट, बदनामीमागे NCP-SP' देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवार, सुळेंवर निशाणा

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील ठाकरे गटाचे २४ नगरसेवक असताना तिकीट श्रीगोंदा मतदारसंघात दिले. त्यामुळे संदेश कार्ले यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील भेटायला वेळ देत नसल्याने संदेश कार्ले यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अहमदनगरमध्ये ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. पक्ष प्रवेशासाठी आज शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत.

Maharashtra Politics: ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आधी सांगली आता पुणे आणि अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी साथ सोडली
Maharashtra Politics : बैठकीत टशनबाजी! शिंदे-ठाकरे आमने-सामने, एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंनी एकमेंकांना दिली खुन्नस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com