Maharashtra Politics : 'जयकुमार गोरेंचा अडकवण्याचा कट, बदनामीमागे NCP-SP' देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवार, सुळेंवर निशाणा

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणात पवारांच्या राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय.. मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले आणि त्यावर पवारांच्या राष्ट्रवादीने काय म्हटलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.
devendra fadnavis supriya sule rohit pawar
devendra fadnavis supriya sule rohit pawarsaam tv
Published On

महिलेला अश्लील फोटो पाठवल्या प्रकरणी वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या मदतीला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आलेत...जयकुमार गोरेंवर महिलेचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता.. या प्रकरणी विरोधकांकडून गोरेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. जयकुमार गोरेंच्या बदनामीमागे पवारांच्या राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप करण्यात केलाय.. त्यामुळे एकच खळबळ उडालीय...

मंत्र्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपलं नाव घेतल्याचा पलटवार रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनी केलाय...ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची कोंडी करणारं हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूयात...

जयकुमार गोरेंचं प्रकरण नेमकं काय?

- 2016

गोरेंनी महिलेला अश्लील फोटो पाठवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

- 2019

सातारा जिल्हा न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने 10 दिवसांची जेलवारी

- 2019

माफीनाम्यानंतर महिलेने गोरेंविरोधातील तक्रार मागे

- 2025

गोरेंकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत महिलेची तक्रार

devendra fadnavis supriya sule rohit pawar
IPL 2025 Live : श्रेयस 97 वर असताना शशांकने स्ट्राईक का दिली नाही? इनिंग संपल्यावर स्पष्टचं सांगितलं, शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडलं?

या प्रकरणी अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलंच गाजलं.. तर रोहित पवारांनी जयकुमार गोरेंच्या हकालपट्टीची मागणी केली. 22 मार्च 2025 ला 1 कोटींच्या खंडणीप्रकरणी पोलिसांनी ट्रॅप लावून महिलेला अटक केलीय. त्यानंतर गोरेंनी 1 कोटीची रक्कम कुठून आणली? असा सवाल उपस्थित केला जात होता... मात्र राजकीय शत्रुत्वातून हे प्रकरण समोर आलंय की यामागे आणखी काही वेगळं कारण आहे? याचा सखोल तपास होण्याची गरज आहे...

devendra fadnavis supriya sule rohit pawar
GT Vs PBKS Live Match : ग्लेन मॅक्सवेल आउट नव्हताच... श्रेयस अय्यरची एक चूक आणि मैदान सोडावं लागलं, नेमकं काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com