Shirpur News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur News : मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

बंधाऱ्यावर पोहण्यास गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : अरुणावती नदीपात्रावर बांधलेल्या केटी वेअर बंधाऱ्याजवळ पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू (Death) झाला. ही घटना सोमवारी (१७ जुलै) दुपारी घडली असून आज (१८ जुलै) सकाळी मुलाचा मृतदेह हाती (Shirpur) लागला. दिनेश रतीलाल मोरे (वय ११) असे मृत मुलाचे नाव आहे. (Maharashtra News)

दिनेश मोरे हा कुटुंबासह वरवाडे (ता. शिरपूर) येथील महादेव मंदिराजवळ वास्तव्यास होता. मित्रांसोबत सोमवारी दुपारी शहराजवळ आमोदे येथे अरुणावती नदीवर बांधलेल्या केटी वेअर बंधाऱ्याजवळ पोहण्यासाठी गेला होता. मात्र (Dhule News) पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याचे मित्र घाबरून घरी परतले. रात्री उशिरापर्यंत दिनेश घरी न आल्याने त्याच्या कुटुंबाने शोधाशोध सुरू केली. त्या वेळी त्याच्या मित्रांनी दिनेश पाण्यात बुडाला असल्याची माहिती दिली.

वडीलांनीच काढला मुलाचा मृतदेह

मंगळवारी सकाळपासून नदीपात्रात शोध सुरू केला. त्याचे वडील रतिलाल मोरे स्वतः पाण्यात उतरले. त्यांनी अर्धा तास शोध घेतल्यानंतर मुलाचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. वडील शिरपूर आगारात बसचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या तीन मुलांपैकी दिनेश मधला मुलगा होता. त्याच्या मागे दोन भाऊ, आई, वडील आहेत. दिनेश येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये राबवला एक दिवा बळीराजासाठी उपक्रम

Crime News : मुळशी पॅटर्न; दारवलीतील घटनेने खळबळ, गायींच्या गोठ्यात आढळला युवकाचा मृतदेह

Piyush Pandey Passed Away: 'अबकी बार मोदी सरकार', 'मिले सुर मेरा तुम्हारा' टॅगलाईनचे जनक पियुष पांडे याचं निधन

Shashank Ketkar : शशांक केतकरच्या मुलांना पाहिलं का? भाऊबीजेला पहिल्यांदाच PHOTOS केले शेअर

'विरोधी पक्षातील नेते अन् पत्रकारांच्या फोनवर नजर''; ठाकरे गटाच्या खासदाराकडून बावनकुळेंच्या अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT