Shirpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime News : अज्ञातांकडून झालेल्या गोळीबारात प्राध्यापक गंभीर; शिरपूर तालुक्यातील घटना

Dhule News : एसपीडीएम कॉलेजचे प्राध्यापक दिनेश पाटील हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी शहादा येथे गेले होते. बहिणीची भेट घेऊन ते रात्री शिरपूरकडे परत येत होते

भूषण अहिरे

धुळे : शिरपूर तालुक्यातील हिंगणी गावाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी प्राध्यापकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये प्राध्यापक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

शिरपूर येथील एसपीडीएम कॉलेजचे प्राध्यापक दिनेश पाटील हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी शहादा (Shahada) येथे गेले होते. बहिणीची भेट घेऊन ते रात्री शिरपूरकडे परत येत होते. याचवेळी मार्गावरील तहार्डी गावाजवळ मागून एका दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी काहीही कारण नसताना गोरीबार केला. यात प्राध्यापक पाटील यांच्या पाठीत व पोटात गोळी लागली. काही अंतरावर असलेल्या गावाजवळ ते पोहोचले असता त्यांची परिस्थिती बघून गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  

त्यानंतर या संदर्भात पोलिसांना (Police) या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. परंतु हा गोळीबार करण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस प्रशासनतर्फे या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, या संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

माजी मुख्यमंत्र्यांसह ४४ नेत्यांना मिळणार बुलेटप्रूफ जॅकेट्स; सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT