Shirpur Crime News Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Crime News: नात्यातील व्यक्तीकडून दोन मुलींवर अत्याचार; जत्रेला गेले असताना घडली घटना

Dhule News : नात्यातील व्यक्तीकडून दोन मुलींवर अत्याचार; जत्रेला गेले असताना घडली घटना

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : अल्पवयीन मुलींवर साक्री व शिरपूर येथे अत्याचार केल्याच्या संशयावरून तीन संशयितांविरोधात शहर पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेगवेगळ्या दिवशी दोनदा अत्याचार केल्यानंतर संशयितांनी मुलींना पळवून नेण्याचाही प्रयत्न केला. संशयितांना (Shirpur) अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रात्रीच रवाना झाले. पीडित मुली एकमेकांच्या नातलग असून, एकाच वस्तीत राहतात. (Breaking Marathi News)

पीडित मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ३० ऑगस्टला इंधवेहट्टी (ता. साक्री) येथे देवाची जत्रा असल्याने मुलगी व तिची आतेबहीण तेथे गेले होते. आतेबहिणीचा चुलतभाऊ दादा बाळू ठेलारी व तानू बापू ठेलारी (दोघे रा. सतारे, ता. शिंदखेडा) हेदेखील जत्रेत गेले होते. रात्री पीडित मुली दुसाने (ता. साक्री) येथे थांबल्या. रात्री अकराला संशयितांनी दोघींना आइस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने (Dhule News) उठवले. त्यानंतर दमदाटी करून दोघींना जंगलात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केला. त्याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली.

पळवून नेण्याचा केला प्रयत्न 
पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी (१५ ऑगस्ट) गावाजवळ देवाच्या कार्यक्रमासाठी सर्व मंडळी गेली होती. पीडित मुली व त्यांच्यासोबत अन्य एक नातलग मुलगी अशा तिन्ही घरी होत्या. रात्री बाराला संशयित दादू ठेलारी, तानू ठेलारी व भटू तांबे (सर्व रा. सतारे) दुचाकीने त्यांच्या वस्तीत पोहचले. त्यांनी तिन्ही मुलींवर अत्याचार केला. त्यांना धमकी देऊन संशयित मध्यरात्री निघून गेले. १६ सप्टेंबरला तिन्ही मुली शेतात जात असताना संशयितांनी तिघींना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापैकी एकीने स्वत:ची सुटका करून आरोळ्या ठोकल्याने त्यांना तिथेच सोडून संशयित फरारी झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

Fitness Diet: ओमलेट की उकडलेले अंडे? वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय कोणता?

Crime News: भयंकर! नवऱ्यानं पत्नीला मोमोजमधून ड्रग्ज दिलं, मित्रासोबत बलात्कार केला अन् रस्त्यावर फेकलं

Tuljabhavani Temple : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून प्रारंभ

Solapur Heavy Rain : सोलापुरात मुसळधार; पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात टाकली रिक्षा, चालक गेला वाहून

SCROLL FOR NEXT