Agriculture News: झाडांवरच सडताहेत कपाशीची बोंड; अतिपावसाचा परिणाम, शेतकरी संकटात

Wardha News :
Cotton Agriculture News
Cotton Agriculture NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: एकीकडे सोयाबीनच्या पिकावर आलेल्या रोगामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता दुसरीकडे अतिपावसामुळे कपाशीचे बोंड झाडांवरच सडत असल्याने शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. याबाबत (Wardha) कृषी विभाग मात्र अनभिज्ञ असून याबाबत मार्गदर्शन करीत नसल्याची (Farmer) शेतकऱ्यांची ओरड आहेत. कपाशीचे बोन्ड सडत असल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात मोठी घट होणार आहे. (Tajya Batmya)

Cotton Agriculture News
Pune Crime News: बारा दिवसात २० लाखांचे ५ कोटी; पाण्याच्या टाकीत पैसे टाकायांचे सांगून फसवणूक

वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा (Heavy Rain) फटका मोठ्या प्रमाणात पिकांना बसला आहे. सोयाबीन हे पीक तर हातचे गेले आहे. शेतकऱ्यांची भिस्त ही कपाशीवर होती. परंतु, आता  बोंड झाडावरच सडत असल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. दहेगाव शिवरात अशीच परिस्थिती अन्य शेतकऱ्यांचीही आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची शेतकऱ्याला असून कृषी विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे.

Cotton Agriculture News
Jalgaon News : अपघातात जखमी पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू; बातमी समजताच पतीची रेल्वेसमोर उडी

वर्धा तालुक्याच्या दहेगाव गावंडे येथील शेतकरी विशाल दाते यांच्या शेतातील कपाशीचे झाडावरील बोंड हे आता सतत झालेल्या पावसामुळे सडत आहे. विशाल दाते हे पारंपरिक शेती व्यवसाय करतात. त्यांच्याकडे २८ एकर शेती असून १४ एकर शेतीमध्ये त्यांनी ४ जूनला कपाशीची लागवड केली. राबराब राबून आता पीक चांगले बहरले असताना कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि आता झाडावरील बोंड सडत आहे.

अतिपावसामुळे कपाशी पिकावर बोडसळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. दोन प्रकारच्या बोडसळीचा प्रादुर्भाव विविध भागात असून शेतकऱ्यांनी रासायनिक बुरशीनाशकाच वापर करून पिकांचे व्यवस्थापन करावे. अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकांना हा फटका बसत असून उत्पादनात घट होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com