Former MIM MLA Farukh Shah joins Ajit Pawar’s NCP group at Mumbai  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: धुळ्यात अजित पवार गटाची ताकद वाढली; औवेसींना मोठा धक्का मोठ्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

Dhule Politics AIMIM Former MLA Farukh Shah Joins NCP: धुळे शहराचे माजी आमदार फारुक शहा यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.

Bharat Jadhav

भुषण अहिरे, साम प्रतिनिधी

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी महायुतीकडून तयारी सुरू झालीय. भाजपनंतर आता अजित पवार गटाने आपला मोर्चा उत्तर महाराष्ट्राकडे वळवलाय. भाजपनं काँग्रेसला धक्का देत माजी आमदार कुणाल पाटील यांचा प्रवेश करून घेतला. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने धुळ्यात एमआयएमच्या पतंगाची दोर कापत औवेसींना धक्का दिलाय.

धुळ्यातील एमआयएम पक्षाचे माजी आमदार फारुख शहा यांनी पक्षाला रामराम ठोकत अजित पवार गटात प्रवेश केलाय. मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला. महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे.

प्रत्येक विभागात आपली ताकद वाढवत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं धुळ्याकडे आपला मोर्चा वळवत तेथील आपली ताकद वाढवण्यास भर ठेवलाय. दोन्ही पक्ष तेथील प्रतिस्पर्धी पक्षातील नाराज आजी-माजी नेत्यांना गळ घालत त्यांचा पक्ष प्रवेश करुन घेत आहे. आज अजित पवार यांनी असादुदीन औवेसी यांना धक्का दिलाय.

एमआयएम पक्षाचे धुळे शहराचे माजी आमदार फारुक शहा यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. फारुक शहा यांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत फारुक शहा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. माजी आमदार फारुख शहा यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा बळ येणार आहे.

एमआयएम पक्षाने ज्यावेळी महाराष्ट्रात प्रवेश करत विधानसभा लढवली होती. त्यावेळी दोन आमदार निवडून आले होते. त्या दोन आमदारापैकी एक फारूक शहा होते. फारुख शहा यांनी २०१९मध्ये एमआयएमकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि पहिल्यांदाच त्यांनी आमदारकी भुषवली होती. मात्र या विधानसभेला फारुख शहा यांचा भाजपच्या अनुप अग्रवाल यांनी पराभव केला. यंदाच्या विधानसभेत तिरंगी लढत धुळ्यात पाहायला मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात युनियन बँकेविरोधात मनसेचा संताप, मराठीतील FIR नाकारल्याने आंदोलन | VIDEO

Kalyan : कल्याणकरांची वाहतूक कोंडीची कटकट संपणार, यु टाईप अन् मलंगगडचे रस्ते चकाचक होणार

Navi Mumbai News : सावधान! सडलेल्या केळीचे वेफर्स, नवी मुंबईतील किळसवाणा प्रकार समोर

Homemade paratha masala recipe: घाईघाईत पराठा बनवताय? अजून टेस्टी बनवण्यासाठी घरच्या घरी बनवा सिक्रेट पराठा मसाला

Pandharpur Crime : पंढरपुर हादरले! माय लेकाची घरात घुसून हत्या; मारेकरी घराला कुलूप लावून पसार

SCROLL FOR NEXT