Jayant Patil: कधीच वेगळा गट केला नाही,साहेबांचा निर्णय मान्य केला; राजीनामा देताना जयंत पाटील भावुक

Jayant Patil Resigns as NCP Sharad Pawar Faction State President: जयंत पाटील यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
Jayant Patil Resigns as NCP Sharad Pawar Faction State President
Jayant Patil announces resignation as NCP state president with an emotional addresssaam tv
Published On

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नवीन प्रदेशाध्यक्ष घोषणेच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी त्यांच्या 7 वर्षातील कार्यकाळावर प्रकाश टाकला. यावेळी बोलताना ते भावुक झालेले पाहायला मिळालेले. माझी कोणतीही संघटना नाही, मी वेगळा गट केला नाही. ना फाउंडेशन काढलं, असलं पाप कधीही केलं नाही. साहेब जो निर्णय देतील तो आम्ही स्वीकारला, आम्ही 25 वर्षे या पक्षात आहोत, या काळात आपण एकही दिवस सुट्टी घेतली नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी आपल्या भावानांना वाट मोकळी करून दिली.

जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची घोषणा केली. यावेळी बोलताना ते भावूक झालेले पाहायला मिळाले. माझे सगळे सहकारी गेले तरी मी साहेबांसोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. या कार्यकाळाच्या ७ वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही. बायकोलाही ते सांगितलं,असं पाटील म्हणाले.

दोन खासदार असलेला भाजप मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (Maharashtra politics update: Jayant Patil quits NCP president post)

जयंत पाटलांनी भाषणाची सुरुवात करतानाच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज यादीत टाकण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच हिंदी सक्तीवरून केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महायुती सरकाराला टार्गेट केलं. साताऱ्यातील पुसेसावळी येथे धर्मावरून दंगल घडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यावर आता कुठेतरी उत्तरेतील प्रभाव दिसू लागलाय. उत्तरेतील काही राज्यातील लोकांना खूश करण्यासाठी हिंदी सक्तीचे प्रयत्न झाले.

मुंबई महापालिका निवडणुकात एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आल्याचे म्हणत जयंत पाटील यांनी सरकावर हल्लाबोल केला. विधानसभेला आपण खूप ताकद लावली परंतु यश मिळालं नाही. आता बिहारमध्ये सगळी मतदार यादी नव्याने करत आहेत. 35 लाख मतदार यांनी बाद केले, असं प्रत्येक राज्यात केलं जाईल. आता हे विविध राज्यात होईल, असा संभाव्य धोकाही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Jayant Patil Resigns as NCP Sharad Pawar Faction State President
Maharashtra Politics: नाराजी, राजीनामा अन् भाजप प्रवेश? जयंत पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

वेगळा गट काढला नाही- जयंत पाटील

जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा किस्सा सांगितला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी यात्रा काढली होती. या यात्रेची शेवटची सभा त्यांच्या मतदारसंघात होती. त्यावेळी पाऊस पडला होता. सगळे लोक निघून गेले होते. त्यामुळे त्यांना आपली अब्रू जातेय की काय असं वाटू लागलं होतं. मात्र पाऊस संपल्यानंतर मोठ्या संख्येने लोक सभेला आल्याचं जयंत पाटील म्हणाले.

मी २,६३३ दिवस पक्षाचा अध्यक्ष

पक्षाचा अध्यक्ष या नात्याने प्रत्येक मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न केला. माझी कोणतीही संघटना नाही, मी वेगळा गट केला नाही. वेगळं फाउंडेशन काढलं नाही, असलं पाप कधीही केलं नाही. साहेब जो निर्णय देतील तो आम्ही स्वीकारला. आम्ही २५ वर्षे या पक्षात आहोत. साहेबांनी निर्णय घेतलेला असतो, त्यावेळी बराच विचार करून निर्णय घेतला असतो, असं जयंत पाटील म्हणाले. मी २,६३३ दिवस पक्षाचा अध्यक्ष आहे. शरद पवारांनी मला अध्यक्षपदाची दोनदा संधी दिली. इतके दिवस मी पक्षाचा अध्यक्ष आहे. आता ही योग्य वेळ आहे की मी आता या पदावरून बाजूला व्हावं, असं जयंत पाटील यांनी नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा करताना म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com