मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात
डंपरने दुचाकीला धडक दिल्याने तिघांचा मृत्यू
मृतांमध्ये काका-पुतण्याचा समावेश
पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू
धुळ्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. मुंबई- आग्रा महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये डंपरखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये काका-पुतण्याचा समावेश आहे. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. काका-पुतण्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा तपास धुळे पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणाजवळ ही अपघाताची घटना घडली. डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुचाकीवरून जाणारे तिघे जण रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर डंपरच्या चाकाखाली तिघेजण चिरडले गेले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघांचा जागीच मृ्त्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता. मृतांमध्ये काका-पुतण्याचा समावेश आहे. या अपघातामुळे मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या तिन्ही मृतांची ओळख पटली आहे. पोलिसांनी तात्काळ डंपर चालकासह डंपर ताब्यात घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास नरडाणा पोलिस आणि वाहतूक पोलिस करत आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पिंपरी- चिंचवड शहरात मंगळवारी रात्री नाशिक फाटा चौकात एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. भरधाव जाणारा मालवाहतूक ट्रक डिव्हायडरवर धडकला. या ट्रकने डिव्हायडरवरील एका विजेच्या खाबाला धडक दिली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचा चुराडा झाला आणि एमएसईबीच्या खांबाचे मोठं नुकसान झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.