Actress Fraud Case: 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक दावा; पोलिसांनी जामीन देण्यास केला विरोध

Actress Fraud Case: लीना मारिया पॉलच्या जामीन अर्जावर आज सुनावणी करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पोलिसांनी विरोध केला आहे. 200 कोटी मनी लाँड्रिंग केसचा निकाल 4 एप्रिलला जाहीर होणार.
Actress Fraud Case
Actress Fraud CaseSaam tv
Published On

Actress Fraud Case: ठग सुकेश चंद्रशेखर याची पत्नी आणि अभिनेत्री लीना मारिया पॉल हिच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद पार पडला. २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित या सुनावणीत दोन्ही बाजूंनी गंभीर दावे करण्यात आले.

मंगळवार, ३१ मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, लीनाच्या वकिलांनी न्यायालयात अनेक धक्कादायक मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की, लीना आणि सुकेश यांच्यातील संबंध मागील काही काळापासून चांगले नव्हते. तसेच, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्याशी सुकेशचा संबंध असल्याचाही उल्लेख करण्यात आला. बचाव पक्षाने ठामपणे दावा केला की, लीना ही स्वतःच्या कर्तृत्वावर उभी राहिलेली अभिनेत्री असून तिची स्वतंत्र ओळख आहे. सुकेशच्या बेकायदेशीर कारवायांबद्दल किंवा कोणत्याही गुन्हेगारी टोळीबद्दल तिला काहीही माहिती नव्हती. त्यामुळे तिची सामाजिक प्रतिमा लक्षात घेता तिला जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली.

Actress Fraud Case
Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी लीनाच्या जामिनाला विरोध दर्शवला. तपास यंत्रणांच्या मते, लीना ही केवळ सुकेशची पत्नी नसून संपूर्ण कटकारस्थानाची ‘सूत्रधार’ आहे. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, सुकेशच्या गुन्हेगारी टोळीत तिची समान भागीदारी होती. खंडणीद्वारे उकळलेल्या कोट्यवधी रुपयांचे व्यवस्थापन आणि त्याचे मनी लाँड्रिंग करण्याची जबाबदारी तिच्यावर होती, असा आरोप करण्यात आला.

Actress Fraud Case
TMKOC: 'तिच्या सासरचे नाही...'; 'तारक मेहता'मध्ये कधीच परत येणार नाही दया बेन, अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

सप्टेंबर २०२१ पासून लीना कारागृहात असून तिच्यावर ‘MCOCA’सह अनेक गंभीर गुन्ह्यांखाली आरोप लावण्यात आले आहेत. बचाव पक्षाने ती एक प्रसिद्ध व्यक्ती असल्याने पळून जाण्याची शक्यता नसल्याचेही नमूद केले. मात्र, तपास यंत्रणांनी ती पुरावे नष्ट करू शकते किंवा साक्षीदारांना धमकावू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणात आता ४ एप्रिल रोजी अंतिम सुनावणी होणार असून, न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com