

शिवमोग्गा जिल्ह्यात भीषण बस अपघात
बस अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्याला धडकली
४० प्रवासी सुरक्षित, १० जखमी
कर्नाटकाच्या शिवमोग्गा जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. जवळपास ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस कठडा तोडत बस पुलाखाली कोसळली. पण सुदैवाने कोणताची जीवितहानी झाली नाहीये. मात्र १० प्रवासी जखमी झाले आहेत.
शिवमोग्गा जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील वीरापुरा गावात हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी येथून भद्रावती गावाकडे जात होती. त्यावेळी वीरापुरा गावतील कागेहल्ला येथे बस अनियंत्रित झाली. त्यानंतर बस पुलाच्या कठड्याला धडकली आणि पुलावरून खाली कोसळली. सुदैवाची गोष्टी ही की यात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही.
शिवमोग्गा येथे झालेल्या बस अपघातात १० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झालेत. प्रशासनाने सर्व जखमींना भद्रावती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आला. ही घटना भद्रावती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
ओडिशाच्या नयागढ जिल्ह्यात दशपल्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकराघाटजवळ सदर बसचा अपघात घडला. या बसमधून ४० भाविक प्रवास करत होते. ही खासगी बस बेरहामपूरहून हरी शंकर येथे भाविकांना घेऊन जात होती. टेकराघाटजवळ ही बस अनियंत्रित होऊन उलटली. ही घटना दोन दिवसापूर्वी घडली होती. हा अपघात इतका भीषण होता की, गाढ झोपेत असलेले भाविक बस बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.