Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : किराणा दुकानदाराच्या घरावर पोलिसांची धाड; २ लाखाचा सुगंधित पानमसाला जप्त

Dhule News : घरी गुटख्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याची माहिती मिळाली

साम टिव्ही ब्युरो

धुळे : राज्यात प्रतिबंधित गुटखा पानमसाल्याची शहरासह जिल्ह्यात विक्रीच्या उद्देशाने तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धुळ्यातील (Dhule) एका किराणा दुकानदाराच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे २ लाखाचा सुगंधित पानमसाला व तंबाखू जप्त केली आहे. (Tajya Batmya)

धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. साक्री (Sakri) रोड येथे राकेश भारतलाल रेलन (रा. ब्लॉक क्रमांक जी ३, रूम क्रमांक ५, कुमारनगर) याने त्याच्या घरी गुटख्याची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून (Dhule Police) पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार कुमारनगरातील राकेश रेलन या किराणा दुकानदाराच्या घरावर छापा टाकला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२ लाखाचा साथ जप्त 

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने किराणा दुकानदाराच्या घरावर धाड टाकत कारवाई केली. या कारवाईत घरात दोन लाख ९ हजार ३१६ रुपयांचा अवैध गुटखा साठा आढळून आला. पोलिसांनी माल जप्त केला असून संशयित राकेश रेलन याला ताब्यात घेत त्याच्याविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे दोन पत्र, सर्व उमेदवार ठरणार अपात्र?

कार्यकर्ते गेले उडत, सत्ता हवी घरात, मंत्र्यांच्या घरातच उमेदवारीची खैरात

Pod Taxi Project: ठाणे,नवी मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये धावणार पॉड टॅक्सी; प्रकल्पाला सरकारची मंजुरी

Winter Joint Pain: हिवाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या कारणं अन् रामबाण उपाय

ठाकरे गटाला महाराष्ट्रात मोठा हादरा; उपनेता, माजी उपमहापौरांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

SCROLL FOR NEXT