NItin Gadkari Saam tv
महाराष्ट्र

तीन- चार वर्षात रस्ते अमेरिकेच्‍या दर्जाचे; मंत्री नितीन गडकरी

तीन- चार वर्षात रस्ते अमेरिकेच्‍या दर्जाचे; मंत्री नितीन गडकरी

भूषण अहिरे

धुळे : धुळे जिल्हा सामाजिक, आर्थिक व शैक्षणीकदृष्टया मागासलेला आहे. परंतु, विकास साधायचा असेल तर पाणी, वीज, संचार व्‍यवस्‍था व रस्‍ते असले तरच तेथे उद्योग व्‍यापार येतो. जिथे उद्योग व्यापार वाढतो तिथे विकास होतो. जिथे रोजगार येतो तेथील गरीबी दूर होते. हेच (Nandurbar) नंदुरबार व धुळे जिल्‍ह्यात करायचे आहे. याच दृष्‍टीने येत्‍या तीन– चार वर्षात दोन्‍ही जिल्‍ह्यातील रस्‍ते हे अमेरिकेच्‍या दर्जाचे असतील; असे आश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बोलताना दिले. (dhule news minister nitin gadkari statment Roads of American standard in three four years)

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज (ता. २१) धुळे (Dhule) शहर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम, प्रकल्पांचे उद्‌घाटने, कार्यारंभ होवून राजर्षी छत्रपती शाहू नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते.

जलसंवर्धनाचे कामे करा

धुळे शहर परिसरात यापुर्वी पाणी टंचाई दिसायची. परंतु, आज पाण्याची समस्‍या जाणवत नाही. बुलढाणा, लातुर, अकोला, वाशिम जिल्‍ह्यात मोठी मोहिम राबविली. गावातले पाणी गावात, शेतातले पाणी शेतात रहायला हवे. त्‍यानुसार या भागातील नदी, नाले खोलीकरण करून जलसंवर्धनाचे काम करायच्‍या सुचना त्‍यांनी अधिकारींना दिल्‍या. तसेच धुळ्यात येतांना माझं मन शांत आहे. कारण डॉ. सुभाष भामरे यांनी जी काम सांगितले होती ती कठीण होती. सुलवाडे जामफल योजना पूर्ण झाली. या योजनेच काम पूर्ण झाल्याने माझ्या डोक्यावरील ओझं कमी झाल्‍याचे देखील त्‍यांनी सांगितले.

राजकारणात खोटी आश्‍वासने नको

राजकारणात खोटी आश्वासन देऊन लोकांना मुर्ख बनवू शकत नाही. जे नेते खोट स्वप्न दाखवितात त्‍यांच्‍याबद्दल तात्‍पुरता प्रेम असत. जे स्वप्न पूर्ण करून दाखवतात जनता त्यांच्यावर विश्वास ठेवते. यामुळे राजकारणात जे बोलू ते केले पाहिले. जे होत नसेल ते समजून सांगितले पाहिले. यामुळे लांगटर्म राजकारण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT