शॉर्ट सर्किटमुळे गहू, संत्रा पिकाची राख; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

शॉर्ट सर्किटमुळे गहू, संत्रा पिकाची राख; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
Fire
FireSaam tv
Published On

अकोला : अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंबाडी शेतशिवरातील संजय वडतकार या शेतकऱ्याच्या 6 एकरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत शेतातील गहू (Wheat) आणि संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (akola news Wheat orange crop ash due to short circuit loss to the farmer)

Fire
Breaking: नारायण राणेंना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

शेतात विद्युत प्रवाह असलेल्या तारेच्या शॉर्टसर्किटमुळे गव्हाचे व संतराच्या झाडांचे जळून पिकाची राखरांगोळी झाली आहे. गहू पिकाची सोंगण चालू असताना (Akola) अचानक शेतामध्ये विजेच्या जिवंत तारा पडल्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे गव्हाच्या पिकाने पेट घेतला. या आगीत शेतकऱ्यांच्या गहू पीक जळून खाक झाला. तर या आगीच्या झळा बाजूला असलेल्या संत्रा पिकालाही बसल्या आहेत. आगीमुळे संत्राची झाडेही जळाली.

शेतकऱ्याच्या हातापायाला इजा

शेतकऱ्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला असता शेतकऱ्याच्या (Farmer) हातापायाला इजा झाल्याची माहिती आहे. दरम्यान गावकऱ्यांनी ही आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. दरम्यान गेल्या पाच ते सात वर्षांपासून विजेच्या तारांचा प्रश्न निर्माण झाला होता. याची तक्रार ही देण्यात आली होती. मात्र याकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे मला नुकसानभरपाई देण्याची मागणीही शेतकऱ्याने केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com