Breaking: नारायण राणेंना हायकोर्टाचा अंतरिम दिलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात केलेला आक्षेपहार्य वक्तव्य प्रकरण
Narayan Rane
Narayan RaneSaam Tv
Published On

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अंतरिम दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून दोन आठवडे संरक्षण देण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी धुळे येथे एक तक्रार नोंदवण्यात आली होती. त्याविरोधात नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हे देखील पाहा -

काय म्हणाले होते उद्धव ठकरे

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला होते. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. आज 74 वर्षे पूर्ण करून 75 व्या वर्षात हीरक महोत्सवी नाही... अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वक्तव्य केले होते.

Narayan Rane
सुपारी घेऊन महाराष्ट्र अस्थिर करण्याचा राणा दाम्पत्याचा डाव : किशोरी पेडणेकर

त्यांनतर नारायण राणे यांच्याविरोधात राज्यभर गुन्हे दाखल झाले होते. त्यात नाशिक, पुणे, रायगड, धुळे अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथके पाठवली होती. त्यांनतर नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. नारायण राणे यांनी त्याआधी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. मात्र आता धुळे येथील गुन्ह्याप्रकरणी राणे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com