सुपारी घेऊन महाराष्ट्र अस्थिर करण्याचा राणा दाम्पत्याचा डाव : किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar On Navneet Rana And Ravi Rana Enters In Mumbai: हनुमान चालीसा वाचायला येतायत पण, तुमचा उद्देश क्लियर नाही असा टोलाही त्यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.
Kishori Pednekar On Navneet Rana And Ravi Rana Enters In Mumbai, Kishori Pednekar on Rana Couple, Kishori Pednekar Latest News
Kishori Pednekar On Navneet Rana And Ravi Rana Enters In Mumbai, Kishori Pednekar on Rana Couple, Kishori Pednekar Latest NewsSaam Tv
Published On

मुंबई: खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दाम्पत्य आज मुंबईत दाखल झाले. त्यांना मिळालेली वाय सुरक्षा सोडून ते विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. याबाबत मुंबईच्या माजी महापौर आण शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप केले आहेत. राणा दाम्पत्य मुंबई अशांत करण्यासाठी आले असून सुपारी घेऊन त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे असा गंभीर आरोप त्यांना शिवसैनिकांवर केला आहे. (Shivsena Leader Kishori Pednekar Slams to Navneet Rana And Ravi Rana for Enters In Mumbai)

हे देखील पहा -

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, शिवसैनिकांची माथी भडकवण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आलं आहे. मुंबईत त्यांना दंगल घडवायची आहे. हे दाम्पत्य अपक्ष आहे. दुसऱ्याच्या जीवावर निवडून येतात. पैशांच्या जोरावर निवडून येतात, माज करतात. आता वाय सुरक्षा मिळाली आहे. त्यामुळे त्यांना देशभरात भ्रमंती करायची आहे. जिथे भाजपचं सरकार नाही, तिथेच हे लोक भ्रमंती करणार हे लिहून ठेवा. हे दाम्पत्य असंच बरळत राहणार आणि मुंबई-महाराष्ट्र अस्थिर करणार. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या संयमी आणि सुसंस्कारी नेतृत्वात काम करतायत. त्यामुळे शिवसैनिक हे संयमी आहेत असं पेडणेकर म्हणाल्या. (Kishori Pednekar on Rana Couple)

तसेच कळून चुकलंय की उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोललं की, संपुर्ण जगात प्रसिद्धी मिळते. यावरु कळतं की उद्धव ठाकरे अनमोल आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसेना अनमोल आहे. तो अनमोल ठेवा हलवायचं काम सुरु आहे. नागरिकांना कळून चुकलंय, या दाम्पत्याने सुपारी घेतली आहे. सुपाऱ्या घेवून यांना वादंग निर्माण करायचा आहे असा आरोप त्यांनी राणा दाम्पत्यावर केला. त्याचप्रमाणे तुम्ही अमरावतीच्या खासदार आहात, तुमच्या मतदार संघात जा ना.. असं म्हणत मुंबईत या, तुमच्या घरच्यांना, दारच्यांना भेटा, तुम्हाला सुपाऱ्या पुरवणाऱ्यांना भेटा. पण मातोश्रीकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही असा इशारा त्यांनी राणा दाम्पत्याला दिला. हनुमान चालीसा वाचायला येतायत पण, तुमचा उद्देश क्लियर नाही असा टोलाही त्यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणावी नाही तर आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणू असा इशारा आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांनी दिला होता. यासाठी त्यांनी रेल्वेचे तिकीटही काढले होत. येत्या २२ एप्रिल रोजी आपण मातोश्रीवर (Matoshri) जाऊन हनुमान चालीसाचे पठण करणार असून त्यासाठी मुंबईला जायचं तिकीट देखील बुक केल्याची माहीती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिली होती.

Kishori Pednekar On Navneet Rana And Ravi Rana Enters In Mumbai, Kishori Pednekar on Rana Couple, Kishori Pednekar Latest News
रवी राणा मातोश्रीवर करणार हनुमान चालीसा पठण; मुंबईचं तिकिट केलं बुक

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आमदार रवी राणा हे दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवास्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दाम्पत्य हे मातोश्रीवर (Matoshri) जाण्यासाठी मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत.त्यांनी कोणतीही सुरक्षा न घेता विमानाने मुंबईत प्रवेश केला आहे. हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राणांसोबत 500 हून अधिक कार्यकर्ते असणार आहेत. यामुळे मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवसैनिक राणा दाम्पत्याचा विरोध करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीवर पाहोचार का हे काही वेळातच स्पष्ट होईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com