Dhule Police Saam tv
महाराष्ट्र

Dhule Police : बनावट पावतींसह बायोडिझेल वाहतुकीचे टँकर जप्त; धुळ्यात चाळीसगाव चौफुली परिसरात कारवाई

Dhule News : चार दिवसांपूर्वीच गाड्यांमध्ये इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या डीईएफ रसायनांचा बनावट साठ्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरवर कारवाई करण्यात आली

भूषण अहिरे

धुळे : धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरवर करवाई करण्यात आली आहे. यात बनावट पावती आणि कागदपत्रांच्या आधारे हा टँकर जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील बनावट पत्त्यावर वाहतूक करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हा टँकर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

धुळे पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच गाड्यांमध्ये इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या डीईएफ रसायनांचा बनावट साठ्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. हे प्रकरण ताजे असतानाच बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरवर कारवाई करण्यात आली आहे. गुजरातमधील कच्छ येथून जळगावकडे बायोडिझेलने भरून जाणाऱ्या या टँकरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव चौफुलीजवळ थांबवत चालकाची चौकशी केली. 

दरम्यान पोलिसांनी टँकर चालकास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील मुक्ताईरोडवरील बनावट पत्त्यावरील बॉन-बॉन फर्मकडे हा माल पोहोचविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी या संदर्भात तपास केला असता सदर फर्म अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले आहे. चालकाकडे बनावट ई-वे बिल आणि टॅक्स इन्व्हाइस तयार करून ही वाहतूक केली जात असल्याचे देखील पोलीस तपासात उघडत झाले आहे. 

पोलिसात गुन्हा दाखल 

आता या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह चाळीसगाव रोड पोलिसांनी हा तपास सुरू ठेवला असून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणात संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १७ लाख ५ हजार ६२३ रुपयांचे बायोडिझेल आणि १० लाख रुपयांचा कंटेनर देखिल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT