Ganesh Festival Saam tv
महाराष्ट्र

Ganesh Festival : गणेशोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी; धुळे पोलीस अधीक्षकांचे आदेश

Dhule News : दहा दिवसांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असून गणेश मंडळांकडून गणरायाची भव्य स्वागत व आगमन मिरवणूक काढण्यात येत आहे. यासाठी मंडळ डीजे लावून मिरवणूक काढत आहेत

भूषण अहिरे

धुळे : गणेशोत्सवात मोठ्या मंडळांकडून मिरवणुकीत किंवा संपूर्ण गणेशोत्सवात डीजे व लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असतो. यामुळे होणार त्रास लक्षात घेता गणेशोत्सवाच्या काळात धुळ्यात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी काढले आहेत. 

गणेशोत्सवाला २७ ऑगस्टपासून सुरवात होत आहे. दहा दिवसांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येत असून गणेश मंडळांकडून गणरायाची भव्य स्वागत व आगमन मिरवणूक काढण्यात येत आहे. यासाठी मंडळ डीजे लावून मिरवणूक काढत आहेत. इतकेच नाही तर संपूर्ण गणेशोत्सवात व विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो. मात्र याचा नागरिकांना त्रास होत असल्याचे समोर आले आहे.  

तर मंडळांवर होणार कडक कारवाई 

डीजे व लेझर लाईटचा होणारा त्रास लक्षात घेता डीजे आणि लेझर लाईट्सच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी हि बंदी घालण्यात आली आहे. याचे आदेश धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. 

जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त 

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मदतीसाठी राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी आणि मोठ्या संख्येने होमगार्ड्सही दाखल झाले आहेत. तर सार्वजनिक मंडळांनी देखावे उभारताना रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक वाहनांना अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील किंवा गुन्हेगारांचे उदात्तीकरण होईल; असे देखावे किंवा बॅनर लावू नयेत, सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर पोस्ट प्रसारित करू नयेत, असे आवाहन धीवरे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Attack On Shiv Sena Leader: शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या घरावर हल्ला

Satara Fire : धाड धाड धाड...! साताऱ्यात भर बाजारपेठत एकावर गोळीबार, परिसरात भीतीचे वातावरण

Maharashtra Politics: अजित पवारांवर टीका; आमदाराकडून संजय राऊतांची जीभ हासडण्याची भाषा

शनिशिगणापूरनंतर शिर्डीत ऑनलाईन गंडा,शिर्डी संस्थांनच्या नावानं बोगस वेबसाईट

Reservation Row: बंजारा,धनगरां विरोधात आदिवासी आक्रमक,आदिवासींची थेट मुंबईत धडक

SCROLL FOR NEXT